Sapna Chaudhary  Dainik Gomantak
मनोरंजन

Sapna Chaudhari: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीवर गुन्हा दाखल!

Sapna Chaudhari: जेव्हा त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा तिला सपना चौधरी, तिचा भाऊ कर्ण आणि तिची आई यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचे आरोपांमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Sapna Chaudhari: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सपना चौधरीविरुद्ध हुंडा मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितल्याचे समोर आले आहे. याबरोबरच, सपना चौधरी, तिचा भाऊ आणि आई यांच्यावर मारहाणीचा आरोपसुद्धा लावण्यात आला आहे. फरिदाबादच्या पलवन महिला ठाण्यात ही केस दाखल करण्यात आली आहे.

सपना चौधरीचा भावाच्या पत्नीने ही केस दाखल केल्याचे म्हटले आहे. पीडीतेच्या म्हणण्यानुसार, या तिघांनी हु्ंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली. जेव्हा त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा तिला सपना चौधरी, तिचा भाऊ कर्ण आणि तिची आई यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचे आरोपांमध्ये म्हटले आहे.

पीडीतेने आरोपांमध्ये म्हटल्यानुसार, 2018 मध्ये दिल्ली( Delhi)मध्ये राहणाऱ्या सपनाचा भाऊ कर्ण चौधरी याच्याबरोबर पीडीतेचे लग्न झाले होते. लग्नात 42 तोळे सोने देण्यात आले होते. त्याबरोबरच, 42 लाख लग्नात खर्च झाले होते.

मुलीच्या जन्मानंतर सासरच्यांनी क्रेटा गाडी मागितली होती. तेव्हा पीडीतेच्या वडीलांकडून 3 लाख रोख, सोने, चांदी दिले मात्र क्रेटा गाडी दिली नसल्याने सासरच्या लोकांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, याआधीदेखील सपना चौधरीवर पोलीस केस दाखल झाले आहेत. पोलीस( Police) याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT