Sania Mirza Shoiab Malik Dainik Gomantak
मनोरंजन

sania - shoaib :"सानिया मिर्जा- शोएबच्या डिवोर्सला मी जबाबदार हे भारतातल्याच"...अभिनेत्री आयेशा काय म्हणाली?

सानिया मिर्जा - शोएब मलीक हे आता विभक्त झाले आहेत यावर आता पाकिस्तानी अभिनेत्रीने मोठं विधान केलं आहे

Rahul sadolikar

शोएब अख्तर आणि सानिया मिर्झाच्या विभक्त झाल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. असे म्हटले जात होते की या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे आणि ते कायदेशीररित्या वेगळे होण्याचा विचार करत आहेत. 

ते वेगळे राहायला लागले आहेत अशाही बातम्यांना उधाण आले आहे . याचे एक कारण म्हणजे शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरसोबतचे कथित अफेअर. मात्र, त्यावर कोणीही चकार शब्द काढला नाही. आता अभिनेत्री आयेशा उमरने अखेर मौन मोडलं आहे.

आयेशा नुकतीच शोएब मलिकने होस्ट केलेल्या एका चॅट शोमध्ये दिसली. मलिकसोबतच्या कथित अफेअरबद्दल विचारले असता, ओमरने प्रतिक्रिया दिली, "मी कधीही विवाहित ,कमीटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. सगळेजण मला ओळखतात."

तिने मलिकसोबत फोटोशूट केल्यानंतर अफवांना उधाण आले होते. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली की अफवा आधी सीमेपलीकडून पसरवल्या गेल्या आणि नंतर त्यांच्याच देशाच्या मीडियाने उचलून धरल्या. साहजिकच आयेशाने भारतातल्या मिडीयावर थेट आरोप केले आहेत.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक, विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, घटस्फोटाचा विचार करत होते आणि टेनिस स्टार सानिया तिच्या दुबईतील घरातूनही बाहेरही पडली होती जे तिने मलिकसोबत शेअर केले होते. 

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांनीही आतापर्यंत घटस्फोटाच्या चर्चेला प्रतिसाद दिलेला नाही. आयेशा उमर हेच दोघांच्या वेगळे होण्याचे कारण असून तिचे आणि शोएबचे अफेअर असल्याचे सांगण्यात आले. पण या सगळ्या अफवा सुरू झाल्यानंतर लगेचच, सानिया आणि शोएब यांनी त्यांच्या नवीन शोची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT