Kranti Redkar Twitter/ @ANI
मनोरंजन

'जातीवरुन केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही': क्रांती रेडकर

क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण आर्यन खान प्रकरणावरुन चांगलचं गाजत असताना आता अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

क्रांती म्हणाली, ''सध्या जे लेटर प्रकाशित होत आहेत, हे पूर्णपणे तथ्यहीन आहेत. अशी पत्रे कोणीही लिहू शकते. समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र सर्वांना दाखविण्यात आले आहे. मात्र ते सातत्याने दाखवून समीर यांना फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर समीर यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांना माहित असलेले पुरावे सादर करावे. माझा पती खोटारडा नाही, त्यांच्यावर केवळे मिडिया ट्रायलच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील, मला त्याबद्दल विश्वास आहे.''

तसेच क्रांती पुढे म्हणाली, ''समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची भिती नाही. नवाब मलिकांना वेळच उत्तर देईल. माझा आपल्या मुंबई पोलिस आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. मला मराठी असण्याचा अभिमान आहे, मात्र आम्हाला रोज धमक्या दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आमची बाजू सत्याची आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आम्ही यामध्ये नक्कीच विजयी होऊ. जातीवरुन केले आरोप आम्ही सहन करणार नाही. राज्य सरकारवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.''

''नवाब मलिक यांच्याकडे आमच्या विरोधात काही पुरावे असतील तर त्यांनी थेट न्यायालयात जावे. तसेच आम्हाला सतत धमकीचे कॉल येत आहेत. केवळ फसवणूकीचे आरोप आमच्यावर करण्यात येत आहेत. पुरावे असतील तर ट्वीट करण्यापेक्षा त्यांनी न्यायालयात सादर करावे, आम्ही मंत्र्यांना थेट न्यायालयात उत्तर देऊ, म्हणत जास्मीन वानखेडे यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे.'' धमकी देणाऱ्यांचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. समीर वानखेडेंच्या बदलीने नक्की कोणाला फायदा होणार आहे, असं म्हणत क्रांती रेडकरने नवाब मलिकांवर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT