Samantha Ruth Prabhu  Instagram
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: 'मागचे सहा महिने माझ्यासाठी कठीण होते,' असं का म्हणाली संमथा?

Samantha Prabhu: मात्र या वाईट दिवसांचा शेवट होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Samantha Prabhu: साऊथ इंडस्ट्रीची क्वीन संमथा प्रभूने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. संमथा कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

सध्या मात्र संमथा तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या सोशल मिडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने एक पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. संमथाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेले सहा महिने माझ्यासाठी खूप कठीण होते.

हा काळ खूप मोठा आणि वाईटसुद्धा होता. मात्र या वाईट दिवसांचा शेवट होत आहे. तिच्या या पोस्टनंतर मात्र चाहत्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे.

तिच्या आय़ुष्यात असे काय झाले आहे, ती कोणत्या अडचणींचा सामना करत आहे की ती अशाप्रकारची पोस्ट लिहत आहे असे प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, संमथा एक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहणार आहे. या काळात तिला फक्त आपल्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे. मायोसिटिसचा इलाज करण्यासाठी ती भर देणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी तिने मेकर्सनी तिला जे पैसे अॅडव्हांस दिले होते ते त्यांना परत दिले आहेत. त्यामुळे ती जेव्हा पुनरागमन करेल तेव्हा ती कोणत्या प्रोजेक्टचा भाग होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, संमथाने विजय देवराकोंडासोबत खुशी या चित्रपटात काम केले आहे. दोघांचेही चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खुशी चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा निरवानाने केले असून हा एक रोमॅंटिक चित्रपट आहे.

महत्वाचे म्हणजे शिवा निरवानाने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांना आत्तापर्यंत नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विजय देवरकोंडा आणि संमथा आपल्या अभिनयाची जादू कायम ठेवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT