Salman Khan Unseen Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Unseen Photo: सलमानने शेअर केला 'किसी का भाई किसी की जान' च्या सेटवरील खास फोटो

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या सेटवरून एक न पाहिलेला फोटो समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून फिल्म कॉरिडॉरमध्ये सुरू होती. आता अखेर त्याचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सलमान खानने (Salman Khan) सेटवरील त्याचा न पाहिलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा नवा अवतार पाहायला मिळत आहे.

  • सलमानने शेअर केलेला फोटो

सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'किसी का भाई किसी की जान' च्या सेटवरील स्वतःचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत (Photo) सलमान खान एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. लांब केस, लाल आणि पांढर्‍या रंगाचे काळे लेदर जॅकेट, चष्मा यामध्ये सलमान खान वेगळाच दिसत होता. त्याचा ऑल ब्लॅक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. हे शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शूट ओव्हर. #KisikaBhaiKisikiJaan #Eid2023 मध्ये येत आहे.

सलमान खानने सोशल मीडियावर (Social Media) ही पोस्ट शेअर करताच या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे. हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटातून (Movie) अनेक तरुण बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहेत. यामध्ये शहनाज गिल, पलक तिवारी, मालविका शर्मा, सिद्धार्थ निगम यांचा समावेश आहे. असे म्हटले जात आहे की, 'बिग बॉस 16' चा स्पर्धक अब्दू रोजिक देखील या चित्रपटाचा भाग असेल आणि डान्सर राघव जुयाल देखील दिसणार आहे.

या चित्रपटात सलमान खानशिवाय दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, जगपती बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT