Tiger 3 Poster Relese  Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3 Poster Relese : सलमान- कॅटरिनाचा ढासू लूक झाला व्हायरल, टायगर 3 चे पोस्टर एकदा पाहाच

सलमान खान आणि कटरिना कैफचा आगामी बहुचर्चित टायगर 3 चं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असुन चाहत्यांना चित्रपटाची रिलीजची उत्सुकता लागुन राहिली आहे.

Rahul sadolikar

सलमान खानचा, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असणारा टायगर 3 लवकरच रिलीज होण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज झाल्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकता पुन्हा एकदा ताणली आहे. चला पाहुया चित्रपटाचं पोस्टर कसं आहे..

टायगर जिंदा है ची पुढची आवृत्ती

सलमान खान आणि कतरिना कैफ या दिवाळीत टायगर 3 सोबत अविनाश सिंग राठोर उर्फ ​​टायगर आणि झोया म्हणून परतणार आहेत . चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे 2 ऑगस्ट रोजी अनावरण करण्यात आले.

टीझर रिलीज होण्याच्या काही दिवस आधी, 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या जवानमध्ये दाखवला जाईल. पोस्टर पाहिल्यावर हेच दिसतं की चित्रपटाचे कथानक टायगर जिंदा है ची पुढची आवृत्ती असेल.

भाईजानने स्वत: केलं पोस्टर शेअर

आता स्वत: भाईजानने टायगरचं पोस्टर रिलीज केलं आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमानने इंस्टाग्रामवर लिहिले, “आ रहा हूं (मी येत आहे)! #Tiger3 दिवाळी 2023 ला. #Tiger3 #YRF50 सह फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर साजरा करा. 

टायगर 3 हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. @katrinakaif | #ManeeshSharma | @yrf.” संगीता बिजलानीने त्यांच्या पोस्टवर "टायगर" असं म्हणत फायर इमोजीसह कमेंट केली. “व्वा हे पाहण्यास उत्सुक आहे,” एका चाहत्यानेही कमेंट केली .

कतरिनाची कॅप्शन

कतरिना कैफने कॅप्शनसह पोस्टर शेअर केले: “कोणतीही मर्यादा नाही. भीती नाही. आता मागे वळून पाहुया. या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये #Tiger3. #YRF50 सह #Tiger3 साजरा करा फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. @beingsalmankhan #ManeeshSharma @yrf.

टायगर 3 चे दिग्दर्शन

टायगर 3 चे दिग्दर्शन बँड बाजा बारात आणि फॅन फेम मनीष शर्मा यांनी केले आहे आणि आदित्य चोप्रा निर्मित आहे. हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, रेवती, रणवीर शौरी, विशाल जेठवा, रिद्धी डोगरा याशिवाय शाहरुख खान पठाणच्या भूमिकेत आहेत.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT