Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss16 : सलमान विकी कौशलला असं काही बोलला कि, सगळे हसायला लागले.

बिग बॉसच्या मंचावर सलमान खान विकी कौशलला असं काही बोलला कि सगळे फॅन्स हसायला लागले.

Rahul sadolikar

सलमान होस्ट करत असलेल्या बिग बॉस सिझन- 16 ची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरूय. कारण भाईजान सलमान खान यांच्या घरात विकी कौशल आणि कियारा अडवाणी आले होते. यावेळी वेगवेगळ्या फनी गेम्स खेळुन दोघांंनीही प्रेक्षकांच मनोरंजन केलं.

विकी कौशल आणि कियारा अडवाणी आपल्या आगामी 'गोविंदा मेरा नाम' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर आले होते.

यावेळी सलमान खान (Salman Khan) आणि विकी कौशल ( Vicky Kaushal) यांच्यात असा काही संवाद झाला कि दोघांसोबत सगळे प्रेक्षकही हसायला लागले.

विकी कौशल आणि कॅटरीना कैफ या क्युट कपलने गेल्याच आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सध्या विकी कौशल आपल्या गोविंदा मेरा नाम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांनी डान्सही केला.

विकी कौशलने जेव्हा सलमानला एक प्रश्न विचारला तेव्हा सलमानने जे उत्तर दिले ते ऐकुन दोघांसोबत सगळे प्रेक्षकही हसायला लागले. विकीने सलमानला विचारल, कि तुमच्यासाठी कधी कुठल्या मुलीने पिक-अप लाईन वापरली आहे का? त्यावर सलमानने पिक-अप लाईन तर नाही नाही वापरली पण मला ड्रॉप मात्र जरुर केले आहे असं उत्तर दिलं यावर दोघांसोबत सगळे प्रेक्षकही हसायला लागले.

यानंतर विकी आणि कियारा दोघे बिग बॉसच्या स्पर्धकांनाही भेटले आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. यानंतर कियारा आणि विकी दोघे रेडिओ जॉकी बनले आणि त्यांनी स्पर्धकांना एकमेकांना गाणी डेडीकेट करण्याचा टास्क दिला.

या दोघांनीही स्पर्धकांसाठी गाणी डेडीकेट केली. विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांच्या येण्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांचाही मूड फ्रेश झाला एवढं नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT