Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Salman Khan Angry on Fan at Jamnagar Airport: बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे.

Manish Jadhav

Salman Khan Angry on Fan at Jamnagar Airport: बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट जून 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात असून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून ज्यामध्ये त्याचा आक्रमक अवतार पाहायला मिळत आहे. अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान जामनगरला पोहोचला होता, मात्र विमानतळावर एका चाहत्याच्या वागण्यामुळे त्याला संताप अनावर झाला.

सलमान खान (Salman Khan) आपली बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा यांच्यासोबत जामनगर विमानतळावर दाखल झाला. भाईजानला पाहताच चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली. सलमान नेहमीप्रमाणे चाहत्यांना दाद देत असतानाच एका चाहत्याने उत्साहाच्या भरात सलमानच्या खांद्यावर हात ठेवला. चाहत्याचे हे कृत्य पाहून सलमानचा पारा चढला. त्याने त्या चाहत्याकडे रागाने पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. लगेचच सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी त्या चाहत्याला बाजूला केले.

सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक युजर्सनी सलमान खानच्या रागाचे समर्थन केले. "एखाद्या सेलिब्रिटीच्या खांद्यावर असा हात ठेवणे चुकीचे आहे, तो काय त्याचा बालपणीचा मित्र आहे का?" अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, "सलमानने ज्या प्रकारे आपल्या रागावर नियंत्रण मिळवून नंतर एका लहान मुलासोबत हसत फोटो काढला, ते पाहून बरे वाटले." अनेकांच्या मते, चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याबद्दल आदर ठेवून ठराविक अंतर राखणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीला संतापलेल्या सलमानने समोर असलेल्या पापाराझींकडे पाहून स्वतःला शांत केले. त्याने लगेच आपला मुड बदलला आणि तिथे उपस्थित असलेल्या एका लहान मुलाला जवळ घेऊन हसतमुखाने फोटो क्लिक केला. सलमानचा हा 'क्विक' बदल पाहून त्याचे चाहते त्याचे कौतुकही करत आहेत. आगामी 'मातृभूमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसली तरी, भाईजानच्या या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर मात्र चांगलीच खळबळ उडवून दिली. विमानतळावर घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

VIDEO: क्षणभराची चूक अन् आयुष्य उद्ध्वस्त! सेल्फीच्या मोहानं घेतला जीव; धबधब्यातील खडकावरुन पाय घसरुन 3 मैत्रीणींचा मृत्यू

ISL 2026: एफसी गोवाचा कल संघातील नव्या चेहऱ्यांकडे, ओडिशाविरुद्ध संघ बदलांचे मार्केझ यांच्याकडून संकेत

SCROLL FOR NEXT