Salman - Amir Gives Eid wishes Dainik Gomantak
मनोरंजन

Salman - Amir Viral Photo : वाह अमर- प्रेमची काय पोझ आहे? सलमान - आमिरने दिल्या ईदच्या शुभेच्छा...

अभिनेता सलमान खान आणि आमिर खानने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे.

Rahul sadolikar

सलमान खान आणि आमिर खान यांनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनी एका फोटोसाठी एकत्र पोज दिली आहे. हा फोटो सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. 

सलमानने त्याच्या सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा जुना मित्र आणि सहकलाकार आमिर खानसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. 

या फोटोत सलमान खानने काळा शर्ट घातलेला दिसतो, तर आमिरने निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये कॅज्युअल ठेवले होते. फोटो शेअर करताना सलमान खानने चंद्राच्या इमोजीसोबत ‘चांद मुबारक’ असे लिहिले आहे. 

चाहत्यांना हा फोटो पाहुन सलमान आणि आमिरच्या 'अंदाज अपना अपना'च्या दिवसांत परत नेले आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट क्लासिक असून काळाच्या कसोटीवर उतरला आहे. सलमान आणि आमिरने प्रेम आणि अमरची भूमिका साकारली होती जे एका श्रीमंत मुलीला आकर्षित करण्यासाठी एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, देशातील टॉप स्टार्समध्ये सलमान खान आणि आमिर खान यांचा समावेश आहे. अलीकडेच, फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेत सलमानला सध्याच्या कलाकारांबद्दलचे त्याचे मत विचारण्यात आले. 

तो म्हणाला, “ते सगळे कष्टाळू आहेत. पण आम्ही पाच जण ते इतक्या सहजासहजी सोडणार नाहीत.” सलमानने पुढे स्पष्टीकरण दिले, “अव पांच में कौन है (हे पाच लोक कोण आहेत)? शाहरुख, आमिर, मी, अक्की आणि अजय. "

थोड्या वेळानंतर , सलमान पुढे म्हणाला, “आम्ही त्यांना त्यांच्या पैशासाठी धावायला देऊ. आम्ही त्यांना थकवू. आमचे चित्रपट चालतात, मग आम्ही पैसे जास्त घेतो.

आम्ही आमच्या चित्रपटांच्या यशानंतर आमची फी वाढवतो. आता त्याचा सामना करण्यासाठी, हे लोकही चित्रपटांसाठी उपलब्ध नसताना त्यांच्या किंमती वाढवतात. असे का?.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT