Sidhu Musewala with Salim Merchant Twitter
मनोरंजन

सिद्धूने केली होती वाढदिवसाची जोरदार तयारी, सलीम मर्चंटने सांगितला भावनिक किस्सा

सिद्धूसोबत सलीम मर्चंट एका गाण्यावर काम करत होता आणि ते लवकरच रिलीज होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) निधनाने त्याचे चाहते आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी समोर आल्यापासून सेलिब्रिटी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शोक संदेश शेअर करत आहेत. संगीतकार सलीम मर्चंटनेही (Salim Merchant) सोशल मीडिया हँडलवर सिद्धूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर दिवंगत गायकासोबतचा एक फोटो शेअर करत सलीमने खुलासा केला की तो सिद्धूसोबत एका गाण्यावर काम करत आहे आणि ते लवकरच रिलीज होणार आहे.

सलीमने पोस्ट करताना लिहिले की, “सिद्धू आता या जगात नाही हे जाणून मला धक्का बसला आणि दुःख झाले. आम्ही लवकरच एक गाणे रिलीज करणार होतो.” सलीमच्या या पोस्टवर अनेक गायकांनी कमेंट करत सिद्धूच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे.

'ते गाणे फक्त सिद्धूच गाऊ शकला असता'

सलीम म्हणाला, "सिद्धू एक दयाळू, आदरणीय आणि मृदू बोलणारं व्यक्तीमत्व होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी सिद्धूला भेटलो होतो. गायिका अफसाना खान, जिच्यासोबत मी एका प्रोजेक्टवर काम केले होते, तिच्याबद्दल खूप चर्चा झाली. सिद्धूशी सहकार्य करण्याचा आग्रह धरला. योगायोगाने माझ्याकडे एक पंजाबी गाणे होते. मला वाटले हे गाणे फक्त सिद्धूच गाऊ शकतो. म्हणून मी चंदीगडला गेलो आणि त्याला भेटलो."

'आम्ही जूनमध्येच गाणे रिलीज करणार होतो...'

सलीम पुढे म्हणाला, 'गेल्या वर्षी हे गाणे ऑक्टोबरमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर आम्हाला रिलीज करायचे होते, पण नंतर निवडणुका आल्या आणि तो व्यस्त झाला, त्यामुळे रिलीज डेट रखडली. निवडणुकीनंतर आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने आम्हाला आणखी विलंब करावा लागला. अखेरीस, आम्ही हे गाणे जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रिलीजपासून फक्त दोन आठवडे दूर होतो आणि ही दुर्घटना घडली."

सिद्धू मुसेवाला 11 जून रोजी आपला 29 वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर आली. सलीमने आपल्या संभाषणात सांगितले की सिद्धूने यावेळी आपला वाढदिवस देसी पंजाबी स्टाईलमध्ये साजरा करण्याची योजना आखली होती. वाढदिवसानिमित्त तो नवीन गाणे घेऊन येणार होता. प्लॅनिंगनुसार तो लवकरच या गाण्याचे पोस्टर रिलीज करणार होता. मात्र त्याआधीच अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT