Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan New Song : दोन मांजरांचा व्हिडीओ शेअर करत 'सलमान'ने नव्या गाण्याचं केलं प्रमोशन...

सलमान खानने 'किसी का भाई किसी की जान' च्या नव्या गाण्याचं प्रमोशन एका अनोख्या अंदाजात केलं आहे.

Rahul sadolikar

सध्या बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'ची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानने अनोख्या अंदाजात केली 'किसी का भाई किसी की जान' या नव्या चित्रपटातल्या 'बिल्ली बिल्ली' या गाण्याचं प्रमोशन एका वेगळ्या स्टाईलने केलं आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने, आपल्या आउट-ऑफ-द-बॉक्स स्टाईलमध्ये सोशल मीडियावर 'किसी का भाई किसी की जान'मधील 'बिल्ली बिल्ली'हे नवीन गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे. दर्शकांची उत्सुकता वाढवून, सलमानने या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हिज्युअलऐवजी काही मांजरींसह फक्त गाण्याचा ऑडिओ प्रेक्षकांसमोर आणला आहे.

सलमानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली'या गाण्याच्या ऑडिओला चाहत्यांची पसंती मिळत असून, निर्मात्यांनी हा ऑडिओ सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज केला आहे. आता चाहते गाण्याच्या व्हिडिओ रिलीजची प्रतीक्षा करत आहे.

'बिल्ली बिल्ली' एक जबरदस्त पंजाबी डांस नंबर असून, यामध्ये मेगास्टार आणि सुखबीर पहिल्यांदाच गाण्यासाठी करत आहेत. सुखबीर हे चार्टबस्टर गाण्यांसाठी ओळखले जातात. या गाण्याचे संगीत सुखबीर यांनी दिले असून कुमार यांची लिरिक्स आहेत.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT