Salaar  Dainik Gomantak
मनोरंजन

Salaar Box Office Collection: 250 कोटीत तयार झालेल्या चित्रपटाने कमावले इतके कोटी

दैनिक गोमन्तक

Salaar Box Office Collection: प्रभासच्या सालारने बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. साहो, राधेश्याम आणि आदिपुरुष या त्याच्या फ्लॉप चित्रपटानंतर सालारने त्याच्या करिअरला सावरल्याचे म्हटले जात आहे.

सालारने बॉक्स ऑफीसच्या आपल्या कमाईने इतिहास रचत नवीन रेकॉर्डदेखील केले आहेत. सालार: सीझ फायर- पार्ट 1' ने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे आणि या चित्रपटाने या वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडून एकट्या भारतात 90.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रभासच्या या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर 'पठाण' आणि 'जवान' सारख्या चित्रपटांना मात दिली आहे. मात्र ओपनिंगबद्दल बोलायचे झाले तर प्रभासचा 'सालार' त्याच्या 'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. 'सालार'ने तीन दिवसात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सुमारे 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या प्रभासच्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी तब्बल 61.00 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे, तीन दिवसांत चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर केवळ 208.05 कोटी रुपयांची कमाई केली. सालारच्या या कलेक्शनने या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपट 'जवान'ला मागे टाकले आहे, ज्याने तीन दिवसांत 206.06 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'सालार'ने दोन दिवसांत जगभरात 243.80 कोटी रुपयांची कमाई केली, तर तीन दिवसांत हा आकडा 315 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने परदेशात जवळपास 70 कोटींची कमाई केली आहे.

प्रभासच्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी 'बाहुबली 2' ने हिंदीमध्ये 510.99 कोटी, 'साहो'ने 145.67 कोटी, 'बाहुबली'ने 118.5 कोटी आणि 'राधे श्याम'ने 19.36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सालार चित्रपटाच्या यशासाठी प्रभासचे कौतुक होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT