Saif Ali Khan's affair Dainik Gomantak
मनोरंजन

Saif Ali Khan: सैफ अली खान पोहचला दवाखान्यात! दुखापतीचं कारण गुलदस्त्यात

Saif Ali Khan: आता सैफ अली खान त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

दैनिक गोमन्तक

Saif Ali Khan: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चांचा भाग बनतात. आता सैफ अली खान त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. अभिनेत्याच्या खांद्यालाही फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. सैफसोबत त्याची पत्नी करीना कपूर खान देखील रुग्णालयात पोहचली आहे.

सैफ अली खानच्या गुडघ्याला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. मात्र हे सर्व कसे घडले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या गुडघ्याला आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. खान कुटुंबातील कोणीही अभिनेत्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

सैफ अली खान सध्या साऊथ चित्रपट 'देवरा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या या चित्रपटात तो 'बहिरा'ची भूमिका साकारत आहे. त्यामुळे शूटिंगदरम्यानच तो जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

मात्र तो जखमी झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील सैफ शूटिंगदरम्यान अनेकदा जखमी झाला आहे. 'क्या कहना' चित्रपटातील एका सीनमध्ये बाईक स्टंट करताना सैफ अली खान जखमी झाला होता. आता अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून किंवा अभिनेत्याने स्वत: खुलासा केल्यानंतरच तो नक्की कशामुळे जखमी झाला हे चाहत्यांना स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT