Music Aumb  Instagram/@kkundrra
मनोरंजन

Rula Deti Hai: तेजस्वी प्रकाशच्या म्युझिक अल्बमचे शूटिंग गोव्यात

'नागिन' टीव्ही मालिकेमधील तेजस्वी आणि करण कुंद्रा हे दोघे गोव्यात एका म्युझिक व्हीडिओच्या शूटिंगसाठी गेले होते.

दैनिक गोमन्तक

तेजस्वी प्रकाश नागिन या मालिकेमुळे अधिक प्रसिद्ध झाली असून अनेकांचे मन जिंकले आहे. बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) नागिन 6 मालिकेमध्ये आहे आणि तीच्या भूमिकेला (Acting) अधिक पसंती मिळाली आहे. तेजस्वी प्रकाशने बिग बॉस 15 (Big Boss 15) मध्येही आपल्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहे आणि करण कुंद्रासोबत तिची केमिस्ट्री सुपरहीट ठरली. हे दोघे सध्या एकत्र काम करताना दिसत आहे. ते गोव्याला (Goa) एका म्युझिक अल्बमच्या (Music Alum) शूटिंगसाठी एकत्र दिसले होते.

तेजस्वी आणि करण हे मनोरंजन क्षेत्रामधील सर्वात सुंदर जोडपे आहेत आणि हे जोडपे "देसी म्युझिक फॅक्टरी" मधील त्यांच्या आगामी "रुला देती है" या गाण्याने (Song) त्यांच्या चाहत्यांना जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या गाण्याचे पोस्टर (Poster) रिलीज करण्यात आले आहे. बिग बॉस सीझन 15 नंतर ,"रुला देती है" (Rula Deti Hai) हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ते एकत्र दिसणार आहेत. या रिअॅलिटी शोदरम्यान या जोडीमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले आणि आता या गाण्यात (Song) त्यांची कोणती केमिस्ट्री आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 'रुला देती है' हे गाणे राणा सोतलने लिहिले आहे, यासर देसाईने गायले आहे तर संगीत रजत नागपालने दिले आहे. हे इमोशनल रोमॅंटिक गाणे आहे, ज्याचे शूटिंग गोव्यात (Goa) झाले आहे.

'रुला देती है' या गाण्यात तेजस्वीसोबत करणचे पहिलेच गाणं आहे. जे राजतने सुंदरपणे संगीतबद्ध केले आहे. गोव्यात या गाण्यांचे शूटिंग करणे हा एक अद्भुत अनुभव होता असे करण म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT