RRR Movie News, RRR team visited Statue of unity News Dainik Gomantak
मनोरंजन

'RRR' चित्रपटाच्या टीमने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला दिली भेट

चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त 'स्टार-स्टडेड लाइनअपचा' समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा 'RRR' चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या जबरदस्त प्रमोशनसाठी अनेक शहरांच्या दौऱ्याचे नियोजन केले होते. दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी बंगळुरू, हैदराबाद आणि दुबई नंतर आता वडोदरा येथील 'सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला भेट दिली. (RRR team visited Statue of unity News)

चित्रपटाचे (Movie) निर्माते आणि कलाकारांनी या प्रवासातील त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक दिसत आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद, बंगळुरू, वडोदरा, दिल्ली (Delhi), अमृतसर, जयपूर, कोलकाता आणि वाराणसीपासून दुबईपर्यंत (Dubai) निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणावर चित्रपटाच्या प्रमोशनची योजना आखली आहे. ते 18 ते 22 मार्च या कालावधीत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशातील प्रमुख शहरांना भेट देत आहेत.

चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त 'स्टार-स्टडेड लाइनअपचा' समावेश आहे. चित्रपटात या दोन मेगा पॉवर स्टार्सशिवाय अजय देवगण, आलिया भट्ट, ऑलिव्हिया मॉरिस महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर समुथिरकानी आणि रे स्टीव्हनसन सहाय्यक भूमिकेत स्क्रीन शेअर करताना दिसतील.

पॅन स्टुडिओच्या जयंती लाल गडा यांनी या चित्रपटाने थिएटर वितरण हक्क आणि सर्व भाषांसाठी जगभरातील इलेक्ट्रॉनिक हक्क प्राप्त केले आहेत. 'RRR' चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT