Govinda  Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Govinda : गोविंदाला त्याचं योग्य स्थान मिळालं नाही असं रोहित शेट्टी का म्हणाला?

गोविंदाला त्याचं योग्य स्थान इंडस्ट्री देऊ शकली नाही असं मत दिग्दर्शक रोहित शेट्टी याने व्यक्त केलं आहे .

Rahul sadolikar

नव्वदीच्या दशकात सलग 10 वर्षे हिट देउनही गोविंदाला त्याचं स्थान देण्यात इंडस्ट्री कमी पडली असं मत दिग्दर्शक रोहित शेट्टीने व्यक्त केले आहे.आज बॉलीवुडमध्ये खान सुपरस्टारचा पगडा आहे. अक्षय कुमारसारखे कलाकार आज वर्षाला 5- 6 चित्रपट करतात पण एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीत एका अभिनेत्यासाठी वाट पाहिली जायची. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा लाडका गोविंदा.

90च्या दशकात गोविंदाने शब्दश: गारुड घातलं होतं.1986 साला पदार्पण केल्यानंतर एकाच वेळी 70 चित्रपट साईन केले होते. त्या काळात गोविंदा एका दिवसात 5 ते 6 चित्रपटाचे शुटींग करत होता. पण काळ बदलला आणि आज गोविंदासाठी एक चित्रपट मिळणं मुश्कील झालं.

अशा काळात गोविंदा प्रेक्षकांना केवळ रिअ‍ॅलीटी शो मध्ये मध्ये प्रमुख पाहुणा म्हणुन दिसतो. गोविंदाच्या याच स्टारडमवर दिग्दर्शक रोहित शेट्टी बोलला आहे. रोहित शेट्टीच्या मते ज्याअर्थी गोविंदाने 10 वर्षे सलग हिट चित्रपट दिले आहेत त्याअर्थी त्याला आज एक मोठं स्थान मिळणं अपेक्षित होतं.

याबाबतीत इंडस्ट्री गोविंदाला न्याय देऊ शकली नाही. गोविदाला आज सुपरस्टार म्हणवुन घेण्याचा आधिकार आहे, असंही रोहित शेट्टी म्हणाला.

रोहित शेट्टीच्या मते 90च्या दशकात गोविंदाने डेविड धवन यांच्यासोबत बॅक टू बॅक हिट दिल्या. गोविंदा आणि डेविड धवन या सुपरस्टार जोडीने 'शोला और शबनम', 'राजा बाबू', 'आॉंखें', 'जोडी नंबर 1', 'कुली नंबर 1' आणि 'हसीना मान जाएगी' सारखे हिट चित्रपट दिले आहेत मला वाटतय गोविंदाला न्याय मिळू शकला नाही, अन्यथा तो सुपरस्टार असता .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT