Cirkus Film Starcast
Cirkus Film Starcast Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh: रोहित शेट्टीच्या नव्या सिनेमामध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंगची होणार एन्ट्री

दैनिक गोमन्तक

Bollywood: रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासून त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या विनोदी चित्रपटामध्ये रणवीर सिंगपासून ते जॅकलीन फर्नांडिसपर्यंत तगडी स्टारकास्ट पहायला मिळेल. या चित्रपटात दिपिका पदुकोण एक स्पेशल सॉंगमध्ये झळकणार आहे. तसेच अजून एका गोष्टीची सध्या बॉलिवुडमध्ये चर्चा सुरु आहे.

Ranveer Singh

अभिनेता रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या 'गोलमाल 5' या ब्लॉकबस्टर सिनेमात एन्ट्री करणार आहे, असे बोलले जाते. सर्कस चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच इव्हेंटमध्ये रोहित शेट्टी कॉमेडियन तयार करतो का? असं विचारण्यात आलं. त्यावर रणवीर सिंगनेच प्रतिक्रिया देत म्हणले की 'अशा कॉमेडियन लोकांच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो.'

रणवीर सिंगच्या या बोलण्यावर पुढे रोहित शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'खूप हुशार माणूस आहे हा..आता हा गोलमालमध्ये येईल.' यामुळेच आता येत्या काळात रणवीर सिंग (Ranveer Singh) गोलमालमध्ये खरंच पहायला मिळेल का? हे स्पष्ट होईल पण सध्या याची चांगली चर्चा रंगली आहे.

'सर्कस' या रोहित शेट्टीच्या सिनेमात रणवीर सिंगचा डबल रोल आहे. हा धमाल विनोदी चित्रपट 23 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात एका स्पेशल सॉंगमुळे दिपिका पदुकोणने चाहच्यांना खूप आकर्षित केले आहे. यापुर्वी दिपिकाने रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्सप्रेस' या सुपरहिट सिनेमात काम केले आहे.

सर्कस सिनेमात अभिनेता रणवीर सिंगसह पूजा हेगडे, जॉनी लीवर, वरुण शर्मा, जॅकलीन फर्नांडिस अशी दमदार स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. या धमाल कॉमेडी सिनेमा (Film) विषयी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT