Jubin Nautiyal Health Update: जुबिन नौटियालने रुग्णालयातून फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट; म्हणाला...

Jubin Nautiyal: प्रसिध्द गायक जुबिन नौटियालला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
Jubin Nautiyal Health Update
Jubin Nautiyal Health UpdateDaink Gomantak
Published on
Updated on

प्रसिध्द गायक जुबिन नौटियाल सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. जिन्यांवरुन खाली पडल्याने जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तब्बेतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जुबिनने एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या तब्बेतीबद्दल माहिती दिली आहे.

जुबिनने इंस्टाग्रामवर (Instagram) रुग्णालयातील एक फोटो शेअर करत तब्बेतीत सुधारणा होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

फोटो (Photo) शेअर करत त्याने लिहिले की, आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता. या गंभीर अपघातातून त्याने मला वाचवले. आता मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून माझ्या तब्बेतीत सुधारणा होत आहे. तुमचं प्रेम आणि प्रार्थनेबद्दल मनापासून आभार".

Jubin Nautiyal Health Update
Nora Fatehi Viral Video: फिफा फॅनफेस्टमध्ये नोराकडून 'तिरंगा' चा अपमान, पाहा व्हिडीओ

जुबिनच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील कमेंट करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. निती मोहनने लिहिलs आहे,"लवकर बरा हो, तुझ्यावर खूप प्रेम आहे". रॅपर बादशाहने लिहिले आहे,"भाऊ लवकर बरा हो".

घरातील जिन्यावरुन खाली उतरत असताना पाय सटकल्याने जुबिनचा अपघात झाला. या अपघातात जुबिन गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा हात आणि डोक्याला दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच आता उजव्या हाताचा जास्त वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

जुबिन नौटियाल हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय गायक आहे. त्याचे 'लूट गये ते हमनवा मेरे', 'रात लंबिया', 'गुठ्ठी मोहब्बत में' अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com