HBD Robert Downy Jr  Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Robert Downy Jr : वयाच्या 6 वर्षी वडिलांनीच ड्रग्ज घ्यायला शिकवलं...या वर्ल्ड सुपरस्टारची विलक्षण गोष्ट...

या मार्वल सुपरस्टारला लहानपणीच विचित्र संघर्षाचा सामना करावा लागला होता...

Rahul sadolikar

Happy Birthday Robert Downy Jr: आपल्या मार्वल सिरीजमुळे जगभरातल्या चित्रपट चाहत्यांचा लाडका बनलेल्या टोनी स्टार्क अर्थात रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याचा आज वाढदिवस. आज पाहुया त्याच्या आयुष्यातला तो काळ जो कुठल्याही लहान मुलाच्या वाट्याला येऊ नये.

'आयर्न मॅन' फेम सुपरस्टार रॉबर्ट डाउनी जूनियर आज, 4 मार्चला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. मार्वल स्टुडिओजच्या सुपरहिट चित्रपटांचा स्टार रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळे आली, ज्यामुळे त्याला लहानपणापासूनच ड्रग्जचे व्यसन होते.

आज, 4 मार्च, त्या हॉलिवूड स्टारचा वाढदिवस आहे ज्याचे बॉलिवूडमध्येही बरेच चाहते आहेत. हा स्टार दुसरा कोणी नसून 'आयर्न मॅन' फेम सुपरस्टार रॉबर्ट डाउनी जूनियर आहे, जो मंगळवारी आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

त्याच्या खऱ्या नावापेक्षाही तो त्याच्या पात्राच्या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि लहान मुले त्याला फक्त 'आयर्न मॅन' या नावानेच ओळखतात. चला, रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही त्यांच्याबद्दल अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या कदाचित तुम्ही याआधी वाचल्या नसतील.

'मार्व्हल स्टुडिओज'च्या सुपरहिट चित्रपटांमध्ये टोनी स्टार्क म्हणजेच आयर्नमॅनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉबर्ट डाउनी जूनियरचा जन्म न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये झाला. रॉबर्टला चित्रपटांची पार्श्वभूमी आहे, त्याचे वडील रॉबर्ट डाउनी सीनियर हे हॉलिवूडमधलं एक मोठे नाव होते. 

त्याची आई एल्सी अॅन फोर्ड देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या वडिलांनी इंडस्ट्रीत प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. पडद्यावर प्रत्येक समस्या पटकन सोडवणाऱ्या 'आयर्न मॅन'ला खऱ्या आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

4 एप्रिल 1965 रोजी जन्मलेले रॉबर्ट डाउनी ज्युनियर हा केवळ 5 वर्षांचा असताना बालकलाकार म्हणून पहिल्यांदा चित्रपटात दिसला. हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झालेला 'पाउंड' चित्रपट होता ज्यात त्याने 'पप्पी'ची भूमिका केली होती.

रॉबर्ट डाउनी ज्युनियर हा प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट आहे. चिनी मार्शल आर्ट्स विंग चुन कुंग फूमध्ये त्याच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. वयाच्या 20 व्या वर्षापासून ते हे शिकत आहेत आणि आजही तो प्रॅक्टिस करतो.

तुम्हाला कदाचित माहित नसेल की रॉबर्ट केवळ अभिनेताच नाही तर एक प्रतिभावान संगीतकार देखील आहे. तो उत्कृष्टपणे गातो आणि गिटार, पियानो आणि ड्रम कसे वाजवायचे हे त्याला ठाऊक आहे.

त्याने स्वतःचा स्वतःचा अल्बम, द फ्यूचरिस्ट देखील रिलीज केला, जो त्याने स्वतःच लिहिला आणि तयार केला.

रॉबर्ट डाउनी ज्युनियर देखील अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्यामुळे अनेकवेळा त्याला त्यातुन बाहेर पडावं लागलं. त्याचा डॉक्युमेंट्री 'सीनियर'मध्ये वडिलांच्या चुकांबद्दलही सांगण्यात आले आहे. 

त्यात काही जुन्या क्लिप आहेत ज्यात त्याच्या वडिलांनी स्वतः आपली चूक मान्य केली आहे की त्यांनी आपल्या मुलाला वयाच्या 6 व्या वर्षी ड्रग्ज घ्यायला शिकवले होते. त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे पहिली पत्नी डेबोरा फॉकनर हिनेही त्याला घटस्फोट दिला होता.

अलीकडेच, रॉबर्ट डाउनी ज्युनियरबद्दल एक मजेदार बातमी चर्चेत आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या च्युइंग गमचा लिलाव ऑनलाइन वेबसाइट eBay वर होत असल्याचे सांगण्यात आले आणि तेही लाखो रुपयांना.

एखाद्याने वेबसाइटवर लिलावासाठी ठेवलेल्या कार्यक्रमात अभिनेत्याने च्युइंगम चघळले आणि फेकून दिल्याची ही पहिलीच बातमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT