Sharmaji Namkeen Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Sharmaji Namkeen Trailer: ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे चाहते त्यांच्या 'शर्माजी नमकीन' या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' (Sharmaji Namkeen) लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या बातमीनंतर त्याचे सर्व चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या शेवटच्या चित्रपटा ट्रेलर रिलीज झाला आहे, जे पाहून चाहत्यांना खूप आनंद होईल, मात्र दिवंगत अभिनेत्याला पुन्हा एकदा पाहताना चाहत्यांचे डोळे भरून आले आहे.

शर्माजी नमकीन हा दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट आहे. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा चित्रपटाचे अनेक भाग शूट झाले होते. परंतु, त्यांच्या निधनानंतर परेश रावल यांनी चित्रपट (Movie) पूर्ण केला. शर्माजी नमकीनचा ट्रेलर (Trailer) ऋषी आणि परेश यांच्या दृश्याना मिक्स करून तयार करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवुडच्या या दोन्ही दिग्गजांना या चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले.

हा पहिलाच असा चित्रपट आहे ज्यामध्ये दोन दिग्गज अभिनेते एकच भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, चित्रपटामध्ये एक निवृत्त व्यक्ती दाखवण्यात आली आहे, जो नोकरीतून काढून टाकल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. स्वत:च्या मुलाकडून शिव्या एकण्यापासून ते निवृत्तीनंतरची भुरळ पडण्यापर्यंतचे अनेक चढ- उतार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. कॉमेडीसोबतच हा चित्रपट इमोशनल आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे, ज्यामध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्याशिवाय जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शिबा चढ्ढा आणि इशा तलवार यासारखे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा प्रीमियम 31 मार्च रोजी जगभरातील 240 देश आणि प्रदेशामध्ये प्राइम व्हिडिओवर होणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT