Kantara 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Kantara 2 Updates : कांताराचा सिक्वल 2024 साली रिलीज होणार...चला पाहुया चित्रपटाचे अपडेट्स

Rahul sadolikar

Rishab Shetty Kantara 2 updates : ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा 2'चे शूटिंग मंगळूरमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 

ऋषभ शेट्टीने या चित्रपटाची कथा पूर्ण केली असून आता तो त्यात आपल्या अवताराची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. 'कांतारा 2'चे बजेट पहिल्या भागापेक्षा खूप जास्त असेल, असेही सांगितले जात आहे.

मोठे अपडेट्स

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा 2' बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अभिनेता आणि त्याच्या टीमने चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्याचे शूटिंग 1 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार असून हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच 'कांतारा' सप्टेंबर 2022 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त झाला.

1 नोव्हेंबरपासून शेड्यूल

आता कांतारा 2 शूटिंगची सुरूवात झाली आहे. पहिल्या भागापेक्षा तो मोठा असेल असे सांगितले जात आहे. बजेटपासून त्याचे शूट मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. इतकंच नाही तर 'कांतारा 2' मध्ये काही नवीन कलाकारही दिसणार आहेत. 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, 'कांतारा 2'चे पहिले शेड्युल 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

ऋषभच्या गावी शूट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ शेट्टी आणि टीमने 'कंतारा 2' ची संपूर्ण कथा लिहिली आहे आणि आता ती प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. 

चित्रपटाचा पहिला भाग अभिनेत्याच्या कुंदापुरा या गावी शूट करण्यात आला होता. पण 'कंतारा 2'चे शूटिंग मंगळुरूमध्ये होणार आहे. कारण स्क्रिप्टच्या मागणीनुसार जंगल, पाणी आणि इतर गोष्टी आहेत. चित्रपटाचे वेळापत्रक चार महिन्यांचे असेल.

ऋषभ शेट्टीचं काम सुरू

ऋषभ शेट्टीने 'कंतारा 2'ची स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतर आता त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तयारी सुरू केली आहे. त्याने आता आपल्या फिजीकवरही काम सुरू केले आहे. 

2024 च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'कांतारा 2'च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 'कांतारा'ने सेट केलेला बेंचमार्कही पार करतो का, हे पाहणे बाकी आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT