Bollywood actress Rhea Chakraborty Dainik Gomantak
मनोरंजन

Rhea Chakraborty:'आता घाबरण्याची वेळ इतरांची' असं का म्हणाली रिया? 'या' शोमधून कमबॅक

Rhea Chakraborty: सर्व अंदाजांना चूकीचे ठरवत रियाने पून्हा एकदा टीव्ही जगतात कमबॅक केले आहे.

दैनिक गोमन्तक

Rhea Chakraborty: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती होय. 2020मध्ये जेव्हा सुशांतसिंग राजपूने आत्महत्याकेली तेव्हा सुशांतच्या परिवाराने रियाला दोषी ठरवले होते.

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाच्या तपासणीवेळी मोठ्या टीकेचा सामना करत असतानाच रिया चक्रवर्तीने ड्रग्जसंबंधी प्रकरणात काही दिवस तुरुंगातही काढले आहेत. देशभरातून सुशांत सिंगराजपूतच्या मृत्यूला रियाला जबाबदार ठरवल्यानंतर तिचे सिनेसृष्टीतील करिअर धोक्यात असल्याचे म्हटले जात होते.

मात्र या तिच्याबाबतच्या सर्व अंदाजांना चूकीचे ठरवत रियाने पून्हा एकदा टीव्ही जगतात कमबॅक केले आहे. जवळजवळ तीन वर्षानंतर ती पून्हा आपल्या करिअरमध्ये मोठे पाऊल टाकत आहे.

रिया कोणत्या माध्यमातून कमबॅक करत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती कोणत्या चित्रपटातून नाही तर एका रिय़ालिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एमटीव्हीवरच्या प्रसिद्ध रोडीज या प्रसिद्ध शोमध्ये ती गॅंगलीडर म्हणून येणार आहे.

प्रिंस नरूला आणि गौतम गुलाटी या दोघानंतर तीसरी गॅंगलीडर रिया चक्रवर्ती असणार आहे. रिया प्रोमोमध्ये आपल्या हेटर्सना आव्हान देताना दिसत आहे. तुम्हाला काय वाटले मी परत नाही येणार घाबरुन जाईन? पण आता घाबरण्याची वेळ इतरांची आहे. भेटूयात ऑडीशनमध्ये असे म्हणताना ती दिसत आहे.

  • रियाच्या एट्रीचा रोडीजवर परिणाम

रियाला रोडीजमध्ये बघून तिचे चाहते खूश झाले आहेत तर काहीजण नाराज झाले आहेत. रियाला गॅंगलीडरच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी रोडीजला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, रोडीजला वादग्रस्त बनविण्याासाठी मेकर्सनी रियाला गॅंगलीडर बनवले आहे. काहीजणांनी हा शो फ्लॉफ होईल असे म्हटले आहे. आता शो जेव्हा ऑनएअर होईल तेव्हा शो हिट होणार की फ्लॉफ हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT