मनोरंजन

Pradip Mukherjee: दिग्गज बंगाली अभिनेते प्रदीप मुखर्जी यांचे निधन

प्रदीप मुखर्जी यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे 22 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप मुखर्जी (76) यांचे आज (सोमवारी) निधन झाले आहे. प. बंगालची राजधानी कोलकाता येथील रुग्णालयात सायंकाळी मुखर्जी (Pradip Mukherjee Passed Away) यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यजित रे यांच्या 'जन अरण्य' मधील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

प्रदीप मुखर्जी यांनी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांच्या 'कहानी 2, दुर्गा रानी सिंह' या चित्रपटात डॉ. मैतीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी मुखर्जी यांना प्रशंसाही मिळाली होती.

प्रदीप मुखर्जी यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे 22 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

प्रदीप मुखर्जी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT