Rekha Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha: रेखानं चाहत्याला मारले? लोक म्हणतात- 'आता तो महिनाभर...'

Rekha: आता हा व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Rekha: बॉलीवूडमध्ये रेखाचे आजही तितकेच महत्वाचे स्थान आहे. वयाच्या ६८ व्या देखील आपल्या सौंदर्याने रेखा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. चेहऱ्यावर हासू आणि उत्साह असणारी रेखा आता मात्र वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे.

चाहत्याने फोटोसाठी रेखा यांना हाक मारली असता त्यांनी त्याला मारल्याचे म्हटले आहे. आता हे नक्की प्रकरण काय हे जाणून घेऊयात.

नुकताच रेखा एक अवॉर्ड शो चा भाग झाल्या होत्या. यावेळी त्यांचे चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी उत्सुक होते. पापाराझींनी फोटो काढल्यानंतर एका चाहत्याने त्यांना फोटोसाठी हाक मारली त्यावेळी रेखा यांनी चेष्ठेने मारल्याचे नाटक करत त्याच्या गालावर हात ठेवला आणि त्याच्याबरोबर फोटोदेखील काढला. आता हा व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले चाहते?

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या संख्येने कंमेट करताना दिसून येत आहेत. एका युजरने म्हटले आहे, रेखाजींनी हात लावल्याने हा माणूस आता महिनाभर अंघोळ करणार नाही असे म्हटले आहे. तर एकाने रेखाजींचा हाच पॉझिटिव्ह अॅटिट्युड सगळ्यांना आवडतो असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने तर त्यांची तुलना जया बच्चन यांच्याशी करत रेखा हजार पटींनी चांगली असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आजची पिढी रेखाच्या प्रतिभेची तुलना करु शकत नसल्याचे म्हटले आहे.

१३ सप्टेंबरला पार पडलेल्या या अवॉर्ड शोमध्ये रणदीप हुड्डा, मनीष मल्होत्रा, रवीना टंडन, वाणी कपूर, जिया शंकर आणि जरीन खान हे कलाकार खास अंदाजात दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT