Rekha-Bhagyashree Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha-Bhagyashree: दोन सुंदर अभिनेत्रींची टक्कर! चाहते म्हणाले- 'इतके वय होऊनही...'

Rekha-Bhagyashree: आणि मी तो माझ्या मनातून काढू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

Rekha-Bhagyashree: बॉलीवूडमधील काही कलाकारांचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान असते. त्यांचे चित्रपट, अभिन कौशल्य आणि सौंदर्य अशा अनेक कारणांमुळे ते प्रेक्षकांचे लाडके असतात. आता रेखा आणि भाग्यश्री पटवर्धन या दोन लोकप्रिय अभिनेत्री आता चर्चेत आल्या आहेत.

'मैंने प्यार किया' या पहिल्याच चित्रपटातून 'सुमन' या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

भाग्यश्रीने अभिनेत्री रेखाचा प्रसिद्ध लूक कॅरी केला आहे आणि जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. 'मैने प्यार किया' अभिनेत्रीने क्रीम रंगाची अनारकली घातली होती, कंबरेजवळ सोनेरी पट्टा होता. मॅचिंग चुरीदार पँट आणि बॉर्डरवर गोल्डन फ्रिल्स असलेल्या दुपट्ट्यासह तिने तिचा लूक स्टाइल केला आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत आणि दोन नेकलेसने तिच्या सौंदर्यात भर पाडली होती.

भाग्यश्रीचा लूक रेखाच्या वोग अरेबियासोबतच्या फोटोशूटपासून प्रेरित होता. फोटोशूटच्या एका लूकमध्ये रेखाने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली मलमल अनारकली घातली होती. तिचा लुक मॅचिंग रंगीत चुरीदार पँट आणि दुपट्ट्याने आणखी खुलून दिसत होता. याव्यतिरिक्त, तिने दागिने परिधान केले होते, ज्यात एक हार, एक चोकर, एक हेडगियर, कानातले आणि हातफूल यांचा समावेश होता.

भाग्यश्रीने तिच्या आणि रेखाच्या लूकचा कोलाजही शेअर केला आणि रेखासाठी एक नोट लिहिली. तिने रेखाला एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणत कौतुक केले आहे. आणि सांगितले की जेव्हापासून तिने 'उमराव जान' अभिनेत्रीचा फोटो पाहिला तेव्हापासून तिला तोच लूक पुन्हा तयार करायचा होता. कोलाज शेअर करताना भाग्यश्रीने लिहिले की, 'फक्त एकदा... मी सांगितलेलं ऐका. अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या रेखाजींना कोणीही हरवू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी मला त्यांचा एक फोटो दिसला आणि मी तो माझ्या मनातून काढू शकले नाही. मला माहित आहे की जे ओरिजनल आहे हे तसं असू शकत नाही पण मला ते करुन पाहायचं होतं.'

आता भाग्यश्रीचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकऱी दोन्ही अभिनेत्रींच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'तुम्ही सुंदर आहात.' दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे, 'यापेक्षा सुंदर रिमेक असू शकत नाही.' एक युजर म्हणतो, 'इतके वय होऊनही तुमच्या सौंदर्यापुढे सगळे फेल आहेत, कोणीही तुमची बरोबरी करु शकणार नाही.;

दरम्यान, सलमान खान बरोबरच्या आपल्या पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून अनेक वर्षे दूर होती. मात्र तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळते. अभिनेत्रीच्या सोशल मिडिया इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT