Ravi kishan - Nagma  Dainik Gomantak
मनोरंजन

Ravi kishan - Nagma :आमच्यात चांगलं...लग्नानंतरच्या नगमा सोबतच्या अफेअरवर अखेर अभिनेत्याने मौन तोडलंच

अभिनेता रवीकिशनने शेवटी त्याच्या आणि नगमाच्या अफेअर बद्दल सांगितलंच

Rahul sadolikar

नेते-राजकारणी रवी किशन अलीकडेच एका टीव्ही मुलाखतीत दिसले. यावेळी त्यांनी राजकीय कारकिर्दीपासून ते चित्रपट कारकिर्दीपर्यंत सर्वच विषयांवर मनमोकळी उत्तरे दिली. यादरम्यान त्यांनी अभिनेत्री नगमासोबतच्या विवाहबाह्य संबंधांच्या बातम्यांवरही प्रतिक्रिया दिली. 

रवी किशन आणि नगमा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची नावे अनेकदा जोडली गेली आहेत. मात्र पुन्हा एकदा त्याने या नात्यावर प्रतिक्रिया दिली असून असं काही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तो विवाहित आहे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहे.

रवी किशन नुकताच आप की अदालत या शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान जेव्हा त्याला नगमासोबतच्या चित्रपट आणि केमिस्ट्रीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की आम्ही दोघे एकत्र चित्रपट करायचो कारण आमचा चित्रपट चांगला चालायचा. तो ब्लॉकबस्टर ठरला. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं लग्न झालंय हे सगळ्यांनाच माहीत होतं. मी पत्नी प्रीती शुक्ला यांचा आदर करतो

त्यामुळे मी कोणत्याही महिलेसोबत असे करण्याची कल्पनाही करू शकत नाही. प्रत्येक वळणावर मला साथ देणारी माझी पत्नी आहे. माझ्याकडे पैसे नसतानाही ती माझ्या पाठीशी उभी राहिली.

मात्र, रवी किशनने कबूल केले की, प्रसिद्धी आणि नशीब मिळाल्यावर तो गर्विष्ठ झाला. पण हा अहंकार बिग बॉसमध्ये एंट्रीनंतर मोडला. याविषयी तो म्हणाला की, माझे चित्रपट हिट होऊ लागले तेव्हा मी अहंकारी झालो होतो.

 माझ्या पत्नीनेच मला बिग बॉससारख्या शो मध्ये जा, असा सल्ला दिला होता. म्हणूनच मी त्या शोमध्ये गेलो होतो. जेव्हा मी बिग बॉसमध्ये बरेच दिवस राहिलो तेव्हा माझे मन स्तब्ध झाले.

अभिनेत्री नगमाबद्दल बोलायचे झाले तर, २००९ मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने रवी किशनसोबतच्या अफेअरवर मौन तोडले होते. 

ती म्हणाली होती की, मला समजत नाही की दोन सहकलाकारांची चांगली बाँडिंग असू शकत नाही का?. शेवटी, आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असताना यात काय प्रॉब्लेम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT