Raveena Tondon Dainik Gomantak
मनोरंजन

Raveena Tondon: वाघिणीचं फोटोशूट प्रकरणी रविनाचं स्पष्टीकरण, ट्विट करत म्हणाली..

व्हायरल व्हिडिओमुळे रवीना पुन्हा सोशल मिडियावर चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. पण अलिकडेच तिने सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला गेलेल्या रवीनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती वाघिणीच्या जवळ जातांना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं रवीनाला नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. रवीनासोबत सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकालाही नोटीस देणार असल्याची माहिती मिळते. आता रवीनानं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

  • रवीना टंडनचे स्पष्टिकरण

रवीना टंडनने (Raveena Tondon) ट्वीट करत म्हंटले की, 'काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवले, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहिती असतात. वाघ राजासारखा फिरत असतो आपण केवळ मूकप्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हालचाल त्यांना विचलीत करु शकते. आमच्या सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नाही. आम्ही शांतपणे केटी वाघिणीला पाहात राहिलो. आम्ही तिच्या वाटेत आलो नाही. यापूर्वी केटी वाघीण पर्यटकांच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.'

सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राच्या नियमांनुसार सफारीदरम्यान वाघ आणि जीप यांच्यात 20 मीटरचं अंतर असणे आवश्यक आहे. पण रवीनाने या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळेच आता तिची चौकशी होणार असून तिच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.

रवीनाचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाल्यानंतर सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राचे उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी माहिती दिली की, 'रवीना ही 22 नोव्हेंबरला रवीना जंगल सफरीसाठी आली होती. वाघाचा फोटो काढण्यासाठी रवीना वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली होती. त्यामुळे आता या प्रकरणी वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची चौकशी होणार आहे".

तिच्या वर्कफ्रंट बालायचे झाले तर 'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोकांच्या आठवणीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT