Rasha Thadani Debut Dainik Gomantak
मनोरंजन

Rasha Thadani Debut: रवीना टंडनची लेक बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, चित्रपटाची रिलीज डेट फायनल; सिंघमचा भाचा 'हिरो'

Rasha Thadani: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि सौंदर्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Manish Jadhav

Rasha Thadani Debut: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि सौंदर्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एकीकडे राशाच्या सौंदर्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्याही समोर येत होत्या.

राशा थडानी दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या पुढील चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशा थडानी या अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्मसाठी कन्फर्म झाली आहे.

दरम्यान, वयाच्या 18 व्या वर्षी पहिला प्रोजेक्ट मिळालेल्या राशा थडानीसोबत अमन देवगण या चित्रपटात दिसणार आहे. अमन देवगण हा दुसरा कोणी नसून अजय देवगणचा (Ajay Devgn) भाचा आहे.

आत्तापर्यंतच्या अपडेटनुसार, या चित्रपटाचे टायटल अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि, राशाच्या पहिल्या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे, जो 9 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तसेच, रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. जिथे एकीकडे राशा थडानीने यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्याचवेळी, अजय देवगणच्या बहिणीचा मुलगा अमन देवगण याला आपल्या मामाप्रमाणे अभिनयात करिअर करायचे आहे.

दुसरीकडे, बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या चित्रपटांमध्ये पाऊल ठेवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. अलीकडेच पलक तिवारीने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

तर दुसरीकडे, लवकरच सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा देखील 'द आर्चीज' या मोस्ट अवेटेड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

त्याचबरोबर, राशा थडानी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर आधीच चर्चेत आहे. तथापि, केवळ सौंदर्यच नाही तर राशा थडानी एक उत्तम नृत्यांगना तसेच एक अप्रतिम गायिकाही आहे. आता आई रवीना टंडन आणि राशाचे चाहतेही तिला मोठ्या पडद्यावर थिरकताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

Goa Politics: गिरीश चोडणकरांसमोर 'सेक्युलर' मतांची सर्वात मोठी परीक्षा

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

SCROLL FOR NEXT