Rashmika Mandanda, Tiger Shroff Dainik Gomantak
मनोरंजन

टायगर श्रॉफसोबत चित्रपटात दिसणार रश्मिका? इंस्टा स्टोरी शेअर करत सांगितले सत्य

रश्मिका बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

दैनिक गोमन्तक

'पुष्पा' स्टार रश्मिका मंदान्ना सतत चर्चेत असते. अलीकडे रश्मिका बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून त्यात ती टायगर श्रॉफसोबत काम करणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता अभिनेत्रीने यावर मौन सोडले आहे. (Rashmika Mandanda, Tiger Shroff)

Rashmika Mandanda, Tiger Shroff

टायगर श्रॉफसोबत जाहिरातीत दिसणार

रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीजवर या बातमीची पुष्टी केली आहे की, ती खरंच टायगर श्रॉफसोबत एका जाहिरातीत दिसणार आहे. टायगरसोबतच्या तिच्या नुकत्याच झालेल्या जाहिरातीच्या शूटच्या सेटवरून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले - "अफवा खऱ्या होत्या मित्रांनो. मी फक्त एका जाहिरातीसाठी शूट केले आहे... टायगरसोबत काम करण्यास मी तयार आहे." या माहितीमुळे आता हे स्पष्ट झाले आहे की रश्मिका टायगरसोबत एका जाहिरातीत दिसणार आहे.

या बॉलिवूड चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना छळकणार

रश्मिका मंदान्ना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. यानंतर तिच्याकडे सिद्धार्थ मल्होत्राचा मिशन मजनू आहे. तिने या वर्षाच्या सुरुवातीला रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'च्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, रश्मिकाकडे तेलुगुमध्ये अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2, थलपथी विजयसोबत वारिसू आणि तामिळमध्ये दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूरसोबत सीता रामम हे मोठे प्रोजोक्ट आहेत. दरम्यान, ईद-अल-अधाच्या शुभ मुहूर्तावर रश्मिकाचा आगामी चित्रपट 'सीता रामम' चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Rashmika Mandanda, Tiger Shroff

टायगर श्रॉफचे आगामी चित्रपट

दुसरीकडे, टायगर श्रॉफबद्दल बोलायचे झाले तर, त्याने नुकतेच क्रिती सेननसोबत विकास बहलच्या गणपत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. टायगर हा अली अब्बास जफरच्या बडे मियाँ छोटे मियामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 2023 आणि 'रॅम्बो', ज्याचे दिग्दर्शन 'वॉर' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT