Rashmika Mandanna Instagram /@RashmikaMandanna
मनोरंजन

Rashmika Mandana: ‘नॅशनल क्रश’ कडे कोटींची संपत्ती, जाणून घ्या

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने आपल्या अभिनयासह सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल क्रश असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची (Rashmika Mandanna) फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेतच (South) नाही तर उत्तर भारतातही आहे. रश्मिका जितकी प्रतिभावान अभिनेत्री आहे तितकीच ती सुंदर आहे. रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या जबरदस्त अभिनयामुळे रश्मिकाला अनेक मोठ्या चित्रपटांच्या (Movie) ऑफर्स मिळतात. त्यामुळेच तीची कमाई देखील भरपूर आहे. रश्मिका मंदान्ना महिना आणि वर्षभरात किती कामावते हे जाणून घेऊया.

कॅन नॉलेजच्या अहवालानुसार रश्मिका मंदान्नाकडे 45 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तिचा मासिक पगार 40 लाखांपेक्षा अधिक असून वर्षभरासाठी 5 कोटींहून अधिक आहे. रश्मिका चित्रपटासाठी (Movie) 4 कोटी रुपये मानधन घेते. रश्मिका मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये सुद्धा काम करते.

* घर

रश्मिकाचे कर्नाटकात घर आहे. येथे ती आपल्या कुटुंबासह राहते. तिचे हे घर खूप आलिशान असून याशिवाय रश्मिकाने मुंबईत एक घर खरेदी केले आहे. पण त्या घरच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

* गाड्या

रश्मिकाकडे मर्सिडीज सी क्लास, ऑडी Q3 आणि रेंज रोव्हर आहे. रश्मिकाने करिअरची सुरुवात 'क्रिक पार्टी' या चित्रपटातून केली. या चित्रपटातून रश्मिकाने कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर रश्मिकाने अनेक हिट कन्नड चित्रपट दिले. यानंतर रश्मिकाने 'चलो' या चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर रश्मिकाने देवदास, देवदास, डियर कॉमरेड, सरिलरु नीकेवरु, भीष्म, पोगारू, सुल्तान, पुष्पा द राइज यासारखे हिट चित्रपट दिले आहेत.

* रश्मिकाचे आगामी चित्रपट

रश्मिका आगामी चित्रपट 'गुड बाय' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. तसेच पुष्पा-2 या चित्रपटामध्ये रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT