Rashmika Mandanna Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Rashmika Mandanna: फक्त 27 वर्षांची रश्मिका कमावते इतके पैसे...एवढ्या लहान वयात इतकी संपत्ती?

अभिनेत्री रश्मिका मंदन्नाचा आज 28 वा वाढदिवस त्यानिमीत्ताने जाणुन घेऊया तिच्या संपत्तीबद्दल..

Rahul sadolikar

HBD Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंधना हिचा आज वाढदिवस. फक्त 28 वर्षाेंची असणारी ही अभिनेत्री कमाईच्या बाबतीत मात्र खूप पुढे आहे. पुष्पा 2 अभिनेत्री रश्मिका मंडन्ना वाढदिवस

पुष्पा: द राइज विथ अल्लू अर्जुन मध्ये दिसलेली रश्मिका मंदान्ना ही पॅन इंडियाची स्टार आहे. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेन्सेशन रश्मिका बुधवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

5 एप्रिल 1996 रोजी जन्मलेली रश्मिका मंदान्ना लहान वयातच मोठे नाव बनली आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीतही ही अभिनेत्री करोडोंची मालक आहे. 

रश्मिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2016 मध्ये क्रिक पार्टी या चित्रपटाद्वारे केली, जो कन्नड भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला अर्थात रश्मिकाच्या कारकिर्दीची सुरुवात चमकदार होती.

पुष्पा द राइजमध्ये श्रीवल्ली बनलेली रश्मिका मंदान्ना आता देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रेम मिळवत आहे. एवढेच नाही तर नॅशनल क्रशचे टायटलही रश्मिकाच्या खात्यात आहे.

प्रॉपर्टीच्या बाबतीत अभिनेत्रीने आपल्या मेहनतीने आतापर्यंत किती प्रॉपर्टी निर्माण केली आहे ते जाणून घेऊया.

रश्मिका मंदान्ना या अभिनेत्रींच्या यादीत येतात ज्या वर्षभर आपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असते. यासोबतच अभिनेत्रीचे वार्षिक उत्पन्नही मजबूत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका एका चित्रपटासाठी 4 कोटी रुपये घेते.

अभिनेत्री एका वर्षात 8 कोटींहून अधिक कमावते. चित्रपटांव्यतिरिक्त, रश्मिका अनेक एंडोर्समेंट आणि ब्रँड प्रमोशन देखील करते.

रश्मिका मंदान्नाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जवळपास 65 कोटींच्या संपत्तीची मालक आहे. अभिनेत्री जेवढी कमाई करते, त्यातील काही भाग ती धार्मिक कार्यातही खर्च करते. रश्मिकाला तिच्या कमाईचा काही भाग चॅरिटीला द्यायलाही आवडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

SCROLL FOR NEXT