Rapper Badshah  Twitter
मनोरंजन

तु कब मरेगा?, ट्रोलरचा प्रश्न; बादशाहने सांगितली सेलिब्रिटींची व्यथा

प्रसिद्ध गायक रॅपर बादशाहने केके यांना श्रद्धांजली वाहिली पण युजर्सने त्याला ट्रोल केले

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक, कृष्णकुमार कुननाथ (KK) आता आपल्यात नाहीत. केकेने आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना वेड लावले होते. मात्र वयाच्या 53 व्या वर्षी केके यांनी मंगळवारी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. केकेच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक रॅपर बादशाहनेही केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र त्यानंतर बादशाह सोशल मीडियावर ट्रोल झाला. (Badshah Trolled for Krishnakumar Kunnath Post)

Badshah post

खरंतर, गायक केकेच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, काही लोकांना अजूनही केके नाही यावर विश्वास बसत नाहीये. केके यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, बॉलीवूड रॅपर आणि गायक बादशाहनेही केकेची आठवण करून देणारी एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. बादशाहने इंस्टा स्टोरीवर केकेचा फोटो शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे. यामध्ये केकेचा फोटो शेअर करत, एका 'हार्ट इमोजीसह का...?', असे लिहिले होते.

मात्र काही यूजर्सना बादशाहची ही स्टोरी आवडली नाही. केकेची ही पोस्ट केल्यानंतर बादशाहाला यूजर्सने करण्यास सुरवात केली. त्याचे कारण म्हणजे बादशाहाने केकेला फॉलो केले नाही आणि आता तो गेल्यानंतर बादशाहने अशी पोस्ट केली जी लोकांना आवडला नाही.

Badshah post

बादशहाला ट्रोल करत युजर्सनी लिहिले आहे की, केके जिवंत असताना बादशाहाने kk ला फॉलो केले नाही, मग आता फोटो का शेअर करत आहात,असे प्रश्न ट्रोलर्स बादशहाला विचारत आहे. तर एका युजरने बादशाहावर राग काढत मूर्खपणाच केला आहे. च्या युजरने तर चक्क 'तू कधी मरशील?' असे म्हणत बादशहावर आपला राग व्यक्त केला. 'आपल्याला दररोज कोणत्या प्रकारच्या द्वेषाचा सामना करावा लागतो याची मी कल्पना देत आहे.' असे या युजरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत बादशाहने सेलिब्रिटींची व्यथा सांगितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT