Badshah Dainik Gomantak
मनोरंजन

Badshah : बात पक्की जी... रॅपर बादशाह लवकरच चढणार बोहल्यावर

प्रसिद्ध रॅपर बादशाह आता बोहल्यावर चढण्यासाठी तयार झाला आहे.

Rahul sadolikar

पंजाबी आणि बॉलिवूड गायक-रॅपर बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बादशाहचे नाव पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत जोडले जात आहे. 

रिपोर्टनुसार, बादशाह आणि ईशा गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याच वेळी, या कपलबद्दल एक अपडेट समोर आले आहे. असे बोलले जात आहे की लवकरच दोघे लग्न करणार आहेत.

रॅपर बादशाह गेल्या अनेक दिवसांपासून त्याची अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता बातम्या येत आहेत की हे जोडपे आता लग्नासाठी सज्ज आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, बादशाह आणि ईशा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे याच महिन्यात गुरुद्वारामध्ये लग्न करणार आहेत. नुकतीच ईशा लग्नासाठी शॉपिंग करताना दिसली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बादशाह आणि ईशाने त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना आधीच सांगितले आहे. असे बोलले जात आहे की, दोघे एका पार्टीत भेटले होते, त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तथापि, बादशाह आणि ईशाकडून या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

बादशाहने 2015 मध्ये जस्मिनसोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे जिचा जन्म 11 जानेवारी 2017 रोजी झाला होता. खुद्द सिंगरनेच याचा खुलासा केला होता. मात्र, 2019 मध्ये पत्नीसोबत विभक्त झाल्याची बातमीही समोर आली होती.

 रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघे अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. जस्मिन तिची मुलगी जेसीसोबत लंडनला शिफ्ट झाली आहे. तर बादशाह मुंबईत राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT