Badshah And Isha Rikhi Dainik Gomantak
मनोरंजन

Rapper Badshah Dating: रॅपर बादशहा घटस्फोटानंतर करतोय 'या' अभिनेत्रीला डेट

दोघे एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती; बादशाहच्या घरच्यांनाही नवीन रिश्ता मंजुर

गोमन्तक डिजिटल टीम

Rapper Badshah Dating: रॅपर आणि गायक बादशाह हा त्याची पत्नी जॅस्मिन हिच्यापासून दोन वर्षांपुर्वीच वेगळा झाला आहे. त्यांनी घटस्फोट घेतला आहे. तेव्हापासून बादशाह सिंगलच होता. पण, आता मात्र बादशाहचे नाव एका अभिनेत्रीशी जोडले जात असून हे दोघे सध्या एकेमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) हिला बादशाह डेट करत असल्याची माहिती आहे. जवळपास एक वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण या दोघांनीही आपले रिलेशन आत्तापर्यंत खासगीच ठेवले आहे.

काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सची वेबसीरीज 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्हज' च्या दुसऱ्या सीझनमध्ये बादशाह दिसून आला होता. त्याने या सीरीजमध्ये कॅमियो केला आहे. यावेळी बादशाहने तो सिंगल असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता ईशा रिखी हीला तो डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यानंतरपासून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ईशा रिखी ही बॉलीवूड पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुझा त्याच्या 'नवाबझादे' या चित्रपटातून तिला ब्रेक देणार असल्याची माहिती आहे, अर्थात अद्याप त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बादशाहने आपल्या या रिलेशनशिपबाबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही कल्पना दिली आहे. आणि त्याचे घरचेही या रिलेशनशिपबाबत खुप खुष आहेत. तथापि, बादशाह स्वतःच्या खासगी आयुष्याची फारशी चर्चा करत नाही. पहिल्या पत्नीशी वादानंतर तो डिस्टर्ब झाला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही आहे. जेसी ग्रेस मसिह सिंग असे त्याच्या मुलीचे नाव आहे, तिचा जन्म २०१७ मध्ये झाला होता. कोरोनानंतर बादशाहची पहिली पत्नी जॅस्मिन ही मुलीसह इंग्लंडला निघून गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim Land Scam: थिवी जमीन गैरव्यवहार प्रकरण; सुलेमान सिद्दीकीला जामीन मंजूर, पोलिसांना 'सीएफएसएल' सादर करण्यात अपयश

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

SCROLL FOR NEXT