Ranveer singh and taimur Dainik Gomantak
मनोरंजन

रणवीर साकारणार 'तैमूर'च्या वडिलांची भूमिका, म्हणाला, तो माझ्या म्हातारपणाचा आधार...

रणवीरला सलमान, शाहरुख आणि आमिर यापैकी कोणात्याही खानसोबत काम करायला आवडणार नाही

दैनिक गोमन्तक

Ranveer Singh: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाइलसाठी आणि विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. कोणत्याही प्रश्नाला तो असे उत्तर देतो, की समोरचा धक्काच राहतो. रणवीरची हीच स्टाईल त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. त्यामुळे रणवीर सारखा चर्चेत राहतो. रणवीरला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की त्याला कोणत्या खानसोबत काम करायला आवडेल. रणवीरने सलमान, शाहरुख आणि आमिर यापैकी कोणाचेही नाव घेतले नाही. तैमूर अली खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नाही तर त्याने तैमूरला त्याच्या म्हातारपणाचा आधार असल्याचे देखील सांगितले होते.

सिद्धार्थ काननला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रणवीरने तैमूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा रणवीरला विचारण्यात आले की त्याला कोणत्या बॉलिवूड खानसोबत काम करायला आवडेल. तेव्हा तो म्हणाला- तैमूर अली खान. तैमूर हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे. तो मोठा स्टार होणार आहे.

रणवीर तैमूरच्या वडिलांची भूमिका साकारणार

या प्रश्नाला उत्तर देतांना रणवीर म्हणाला, 'तैमूर जेव्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल, तेव्हा मी म्हातारा होईल आणि मला म्हातारपणात अभिनय सोडायचा नाही. म्हणून त्यावेळी मला फक्त तैमूरच्या वडिलांची भूमिका मिळेल. म्हणून तो माझ्या मला वृद्धापकाळाचा आधार आहे. त्याने मोठं होवून चांगलं काम करावं, अनेक चित्रपट करावे आणि तेव्हा मी त्याच्या प्रत्येक चित्रपटात वडिलांची भूमिका साकारणार.'

रणवीर शेवटचा जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट रॉकी आणि रानी की लव्हस्टोरीवर काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

SCROLL FOR NEXT