Ranveer Singh Photoshoot Controversy| Nude Photoshoot Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh Photoshoot: फोटोशूट प्रकरणात मोठा खुलासा, सोशल मीडियावर फोटो सोबत छेडछाड

Ranveer Singh Controversy: फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगने पोलिसांसमोर आपल्या जबाबात दावा केला आहे की त्याच्याकडे असलेल्या सर्व फोटोंमधून कोणीतरी फोटो मॉर्फ केला आहे.

दैनिक गोमन्तक

रणवीर सिंगच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. जेव्हापासून त्याने न्युड फोटोशूट केले आहे. तो वादाचा एक विषय बनला आहे. लोकांना रणवीरचे फोटोशूट आवडले नाही, त्यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. आता रणवीरने याप्रकरणी जबाब नोंदवला आहे. रणवीर सिंगने आपल्या वक्तव्यात पोलिसांसमोर दावा केला आहे की, त्याच्याकडे असलेल्या सर्व फोटोंमधून कोणीतरी फोटो मॉर्फ केला आहे. ज्या पद्धतीने हे फोटोशूट केले आहे, तसे चित्रीकरण झाले नसल्याचे रणवीरने म्हटले आहे. पोलिसांनी रणवीर सिंगचा जबाब नोंदवला आहे, आता ते त्याचा तपास करणार आहे.

हे प्रश्न विचारले

रणवीर सिंगला (Ranveer Singh) पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले होते. रणवीरसोबत न्यूड फोटोशूटचा कॉन्ट्रॅक्ट कोणत्या कंपनीसोबत होता. फोटोशूट केव्हा आणि कुठे केले होते, तुम्हाला माहीत आहे का की अशा शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात.

काय आहे प्रकरण

रणवीर सिंगने काही दिवसांपुर्वी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो समोर येताच व्हायरल झाले होते. रणवीरने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटोशूट काहींना आवडले, तर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. रणवीर सिंग लवकरच आलिया भट्टसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT