Animal Poster Release   Dainik Gomantak
मनोरंजन

Animal Poster : "तो मोहक आहे ;पण जंगलीही आहे"... रणबीर कपूरच्या ॲनिमलचं नवं पोस्टर रिलीज

अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित ॲनिमल चित्रपटाचं एक भन्नाट पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

Rahul sadolikar

अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित ॲनिमल चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच रिलीज झालं असुन रणबीरच्या चाहत्यांना त्याचा हा नवा लूक पाहुन नक्कीच एक सरप्राईज मिळणार आहे.

टिझरही लवकरच रिलीज

सोमवारी इंस्टाग्रामवर, टी-सीरीजने ॲनिमलच्या टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली. गेले काही दिवस ॲनिमल चित्रपटाबाबत सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आलं होतं.

हा चित्रपट आणि कथा विशेष म्हणजे चित्रपटाचं नाव याबाबत रणबीरच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागुन राहिली आहे.

रणबीरचा हटके लूक

पोस्टरमध्ये रणबीर हातात लायटर धरून सिगारेट ओढताना दिसतो. यावेळी रणबीर निळ्या रंगाचा सूटमध्ये दिसतो. एका बाजूला पाहत रणबीरचा लूक खूपच डॅशिंग दिसत आहे.

या फोटोत रणबीरने डार्क सनग्लासेस घातलेले दिसतात. लांब केसांमधला रणबीरचा हा लूक चाहत्यांना काहीतरी वेगळी गोष्ट देणार हे नक्की.

मिळालेल्या माहितीनुसार ॲनिमलचा टीझर 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता रिलीज होईल. 

चित्रपट 1 डिसेंबरला होणार रिलीज

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी जगभरातल्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

पोस्टर शेअर करताना T-Series ने त्याला कॅप्शन दिले आहे, "तो मोहक आहे...तो जंगली आहे...तुम्हाला त्याचा राग 28 सप्टेंबरला दिसेल. AnimalTeaserOn28thSept @AnimalTheFilm #AnimalOn1stDec."

'ॲनिमल'विषयी

हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत तसेच जगभरातल्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांच्या सिने 1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

या चित्रपटात अनिल कपूर , रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत. अॅनिमलच्या टीमने जुलैमध्ये अॅनिमलचे शूटिंग गुंडाळले.

रिलीज डेट का पुढे ढकलली

चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल बोलताना असं म्हणाला होता, "आम्ही 11 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित न करण्याचे एकमेव कारण म्हणजे गुणवत्ता. मी तुम्हाला चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम कसे असते ते समजावून सांगणार नाही.

कारण ते तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकते. उदाहरणार्थ, चित्रपटात सात गाणी आहेत आणि जेव्हा सात गाण्यांचा 5 भाषांनी गुणाकार केला जातो तेव्हा ती 35 गाणी बनतात."

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT