Ranbir Kapoor and Alia Bhatt Dance in Wedding Ceremony Instagram
मनोरंजन

रणबीर अन् आलियाच्या संगीत डान्सचा व्हिडीओ पाहिलात का...

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नसोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी 15 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. नातेवाईक आणि बॉलीवुड कलाकारांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये वर-मालेचा कार्यक्रम दिसत असून दुसऱ्या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीर शाहरूख खान यांच्या छैय्या छैय्या या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

व्हायरलभयाणीने इन्स्टाग्रामवर ( Instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ वर-माला कार्यक्रमाचा असून यामध्ये रणबीरचे मित्र त्याला उचलताना दिसत आहे. पण रणबीर त्यांना खाली उतरवायल लावतो त्यानंतर आलिया रणबीरला वर-माला घालते.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये (Video) रणबीर आणि आलिया किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या 'छैय्या छैय्या' या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॅमेन्टचा वर्षाव केला आहे.

तिसऱ्या व्हिडीओ आलिया आणि कारण जोहर संगीत कार्यक्रमाचा आनंद घेतांना दिसत आहेत. हे दोघे 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटांमधील गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत.

नीतू कपूर म्हणाल्या...

रणबीर आलियाच्या लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे मनापासून आभार मानले. तसेच आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले तेव्हा, नीतू कपूर यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि म्हणाल्या सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन आराम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT