Virat Kohli Biopic Dainik Gomantak
मनोरंजन

Virat Kohli Biopic : विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये साऊथचा हा सुपरस्टार करणार काम...

भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली याच्या बायोपिकमध्ये हा अभिनेता काम करणार आहे

Rahul sadolikar

भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली याचा चित्रपटांशी तसा जवळचा संबंध आहे त्याचं कारण म्हणजे त्याची पत्नी अनुष्का शर्मा एक नावाजलेली अभिनेत्री आहे ;पण आता विराटचा चित्रपटांशी तसा थेट संबंध आला आहे त्याचं कारण म्हणजे विराट कोहलीवर आता एक बायोपिक लवकरच येतोय आणि यासाठी साऊथचा एक सुपरस्टार कामाला लागला आहे.

साऊथ स्टार रामचरणने नुकतेच नाटू नाटूबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याने आणि ज्युनियर NTR ने ऑस्कर 2023 मध्ये परफॉर्म का केले नाही हे सांगितले. विराट कोहलीच्या बायोपिकवरही उत्तर दिले. 

ऑस्कर जिंकल्यानंतर राम चरणने एक मुलाखत दिली आहे. नाटू नाटू वर नाचत का नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तर यावर त्याने सांगितले की, त्याला स्वतः या गाण्यावर ऑस्करमध्ये डान्स करायचा होता. मात्र ऑस्कर समितीने त्याच्याशी संपर्क साधला नाही. मात्र, तिथे त्याचे गाणे सादर झाल्याचा आनंद आहे.

राम चरणला एक प्रश्न विचारला तेव्हा खूप विचार केल्यानंतर, त्याने सांगितले की, त्याला स्पोर्ट्स फिल्म करायला आवडेल. तो म्हणतो की, मला खूप दिवसांपासून स्पोर्ट्स फिल्म करायची इच्छा होती जी प्रलंबित आहे. 

यावर जेव्हा त्याला विचारण्यात आले की जर विराट कोहलीवर बायोपिक बनला तर त्याला ही भूमिका करायला आवडेल का? त्यामुळे अभिनेत्याने पटकन होकार दिला आणि त्याला एक उत्तम सूचना म्हटले.

अलीकडेच विराट कोहलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो खेळाच्या मैदानात RRR च्या नटू नातूवर नाचताना दिसत होता. हा व्हिडिओ क्रीडाप्रेमींमध्ये चांगलाच व्हायरल झाला. थोडक्यात विराट कोहलीचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा संकेतच आता मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT