Raksha Bandhan Trailer Instagram
मनोरंजन

अक्षयचा 'Raksha Bandhan' नॅशनल हॉलिडे असुनही करू शकला नाही कमाल

Akshay Kumar New Movie: आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटाने निर्मात्यांना धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली. सुट्या असुनही हा चित्रपट चांगला व्यवसाय करू शकला नाही. यामुळे रक्षाबंधनाच्या कमाईत घट झाली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटाने निर्मात्यांना चांगलाच धक्का दिला आहे. पाचव्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टलाही रक्षाबंधनाची कमाई विशेष झाली नव्हती. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस होत असलेली घसरण लक्षात घेता अक्षय कुमारचा हा चित्रपट कोटींचा आकडाही 100 गाठेल असे वाटत नाही. अक्षयने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही ही आणखी एक बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) पाचव्या दिवशीची कमाई सामान्य होती. बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. रक्षाबंधनाने दुसऱ्या दिवशी 6 ते 6.40 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.80 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशीही चित्रपटाने 6-7 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी 15 ऑगस्टला अक्षयच्या चित्रपटाने 6 ते 7 कोटींची कमाई केली होती. स्वातंत्र्यदिनीही चित्रपटाच्या कमाईचा फारसा फायदा झाला नाही.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयच्या आधीच्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाप्रमाणेच 'रक्षा बंधन'चे शोही रद्द केले जात आहेत. 70 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 30.4 कोटींची कमाई केली आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर पुन्हा एकदा आनंद एल राय यांच्या चित्रपटात (Movie) दिसणार आहेत. अक्षयचा हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या आंबट-गोड नात्यावर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT