Actress Rakhi Sawant Twitter/@rantwithlee
मनोरंजन

Video: आमिर खानच्या घटस्फोटामुळे राखी सावंत झाली दु: खी म्हणाली...

याच अनुषंगाने राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आमिर खानच्या (Aamir Khan) घटस्फोटावर (Divorce) विधान करताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) केवळ 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) या नावाने प्रसिद्ध नाही तर, ती दररोज असे काहीतरी करत असते, ज्यामुळे तिचे नाव ठळक बातम्यांमध्ये येते. बरं, काहीही असो, राखी तिच्या व्हिडिओंद्वारे लोकांचे मनोरंजनही करते. राखीचे व्हिडिओ येताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. याच अनुषंगाने राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आमिर खानच्या (Aamir Khan) घटस्फोटावर (Divorce) विधान करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, जेव्हा फोटोग्राफरने राखीला आमिर खानच्या घटस्फोटाबद्दल आपले मत विचारले तर राखीने एक अतिशय मजेदार उत्तर दिले.(Rakhi Sawant sad on Aamir Khans divorce)

राखी सावंतचा हा व्हिडिओ लोकांना खुपचं आवडला आहे. व्हिडिओमध्ये राखी असे म्हणताना दिसत आहे, "माझा दृष्टिकोन काय असेल घटस्फोट वर मला वाईट वाटते एखाद्याचे घटस्फोट झाले तर, इथे माझा संसार होत नाही आहे आणि लोकं घटस्फोट घेत आहेत. नवरा शोधून मला घेऊन ये." यानंतर राखी म्हणते की कुणीतरी पुन्हा मला स्वयंवर करा. राखीचा हा व्हिडिओ वूंपलाच्या अधिकृत पेजवरून शेअर केला गेला आहे, ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, 'दीपक कलालला तुमचं लोकेशन जाणून घेयचं आहे'. त्याचवेळी दुसर्‍या यूझर्सने राखीला अमेझिंग असे म्हंटले आहे.

राखी सावंत यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायला गेलो तर तिचे नुकतेच 'ड्रीम में एंट्री' (Dream main entry) गाणे रिलीज झाले आहे, ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या गाण्यातील राखीच्या डान्सने पुन्हा एकदा लोकांना खूप प्रभावित केले आहे. काही वेळातच या गाण्याला आतापर्यंत 10 दशलक्ष व्यूज मिळाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

Sindhudurg Shiroda Beach: शिरोडा- वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले, चौघांचा वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT