Bollywood actress Rakhi Sawant Dainik Gomantak
मनोरंजन

राखी सावंतने केली सलमानची वकिली

पत्रकार प्रकरणावर सोडलं मौन

दैनिक गोमन्तक

सलमान खानला 5 एप्रिलला अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आली आहे. 2019 मध्ये एका पत्रकाराने सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. या आरोपात पत्रकाराला मारहाण करण्यासोबतच त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.(Rakhi Sawant defends Salman)

राखी सावंतने सलमान खानबद्दल सांगितल्या काही खास गोष्टी

सलमान खानचे नेहमीच खुलेपणाने कौतुक करणाऱ्या राखी सावंतने तिच्या खास शैलीत सलमान खानचा बचाव केला आहे. या वादावर राखी सावंतची प्रतिक्रिया विचारली असता तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'कोणताही मीडिया कधीच वाईट नसतो, पण जेव्हा तुम्ही मोठी स्टार बनता तेव्हा काही प्रश्न तुम्हाला दुखावतात. सलमानचे चित्रपट सुपरहिट आहेत, त्याला लाईक करणारे लाखो लोक आहेत, पण कुठेतरी त्याला आयुष्यात तो आनंद मिळाला नाही. ती पुढे म्हणाली की, मला वाटते की सलमान खानकडे सर्व काही आहे, परंतु त्याच्या अयुष्यात एक पोकळी आहे. जर तुम्ही सतत त्याच्या वेदनेवर बोट ठेवले तर तो देखील अडचणीत येऊ शकतो, तो देखील एक माणूस आहे.'

राखी पुढे (Rakhi Sawant) म्हणाली, 'तुम्हाला माहित नसेल पण सलमान नेहमीच तणावाखाली असतो, जेव्हा त्याचे चित्रपट रिलीज होतात, तेव्हा तो त्याच्या चाहत्यांसमोर यायचाही नाही. कोणी चुकीचा प्रश्न विचारला तर त्याला राग येईल, तो सुद्धा माणूस आहे, त्यामुळे तो काही बोलला असेल, पण त्याच्यावर कोणी गुन्हा दाखल करावा असे मला वाटत नाही.

24 एप्रिल 2019 रोजीची ती घटना नेमकी काय होती

24 एप्रिल 2019 रोजी ही घटना घडली आहे, ज्यात पत्रकार अशोक पांडे यांनी तक्रार केली आहे आणि सांगितले आहे की, ते त्यांच्या कॅमेरामनसह कारने जुहूहून कांदिवलीला जात होते आणि रस्त्यात सलमान खान (Salman Khan) सायकल चालवताना दिसला. यादरम्यान त्याने सलमानचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्या दोन अंगरक्षकांची परवानगी मागितली आणि त्यालाही परवानगी मिळाली. त्या याचिकेत म्हटले आहे की, जेव्हा पत्रकाराने सलमान खानला व्हिडिओ बनवताना पाहिले तेव्हा अभिनेत्याला तो आवडला नाही आणि त्याने विरोध केला. याशिवाय अभिनेत्याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर कथितपणे मारहाण केल्याचेही सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT