Rajpal Yadav  Dainik Gomantak
मनोरंजन

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या चेक बाऊन्स प्रकरणाशी संबंधित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.

Manish Jadhav

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या चेक बाऊन्स प्रकरणाशी संबंधित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राजपाल यादवला कडक शब्दांत फटकारले. त्याला येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत तक्रारदाराला दोन कोटी रुपये देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जोपर्यंत हा संपूर्ण आर्थिक भरणा केला जात नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या त्याच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

सुनावणीसाठी राजपाल यादव स्वतः न्यायालयात उपस्थित होता आणि तो सोबत 1 कोटी 15 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देखील घेऊन आला होता. उरलेली 85 लाखांची रक्कम त्याला 13 ऑक्टोबरपूर्वी तक्रारदाराला द्यावी लागणार आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी राजपालच्या वर्तनावर आणि कायद्याच्या दरोड्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार मुदत देऊनही तक्रारदाराला त्याचे पैसे मिळत नसल्याबद्दल न्यायालयाने खडे बोल सुनावले. कायद्याचा या प्रकारे गैरवापर करणे योग्य नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

सुनावणीच्या अखेरीस न्यायमूर्तींनी राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्याशी संवाद साधताना मिश्कील टिप्पणी केली. राजपालला ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी त्याला सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली की, तुझ्या चित्रपटाचे नाव जसे ‘अता पता लापता’ आहे, तसेच तुझे पैसेही आता गायब झाले आहेत.

दरम्यान, राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, त्याने पैसे जमा करण्यासाठी रजिस्ट्रीशी संपर्क साधला, परंतु आरटीजीएस मान्य न झाल्यामुळे तो डीडी घेऊन आला आहे. तसेच त्याची मालमत्ता खरेदी करणारे ग्राहकही न्यायालयात हजर असून, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर उरलेली रक्कमही लगेच दिली जाईल, असे वकिलांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT