Rajpal Yadav Dainik Gomantak
मनोरंजन

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Rajpal Yadav Smoking Room Demand In Jail: चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवने आपली भूमिका मांडली.

Manish Jadhav

Rajpal Yadav Smoking Room Demand In Jail: चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवने आपली भूमिका मांडली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राजपालने चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला की, कठीण काळात त्याला लोकांकडून भरभरुन प्रेम मिळाले. या प्रकरणातील कायदेशीर बाजू मांडण्यासाठी त्याने आपल्या वकीलांकडे बोट दाखवले असले तरी तुरुंगातील सुधारणांबाबत त्याने केलेली विधाने सध्या चर्चेत आहेत.

राजपाल यादवने (Rajpal Yadav) तुरुंग प्रशासनाकडे एक वेगळी मागणी केली. विमानतळावर ज्याप्रमाणे धूम्रपानासाठी स्वतंत्र खोल्या (Smoking Rooms) असतात, तशी सोय तुरुंगातही असावी, असे त्याने म्हटले. आपण तंबाखूचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करतानाच त्याने कबूल केले की, त्याने स्वतः अनेकदा धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला. तुरुंगात असणाऱ्या कैद्यांना अशा प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे त्याचे मत आहे.

तुरुंग (Jail) सुधारणांबाबत बोलताना राजपाल म्हणाला की, तुरुंग हे गुन्हेगारांचे सुधार केंद्र असायला हवे. तिथे गेलेल्या व्यक्तीच्या वागणुकीत बदल होणे महत्त्वाचे आहे. मात्र, जे गुन्हेगार स्वतःला बदलण्यास तयार नाहीत, त्यांच्यासाठी कायद्याचा कठोर बडगा असायलाच हवा, असेही त्याने नमूद केले. 9 कोटी रुपयांच्या या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला. त्याने तक्रारदाराकडे दीड कोटी रुपये जमा केल्याची दखल घेत न्यायालयाने 18 मार्चपर्यंत त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

राजपालच्या संकटाच्या काळात सोनू सूदसारख्या अनेक चित्रपट कलाकारांनी त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना राजपाल म्हणाला की, त्याला लोकांची सहानुभूती नको तर थोडे काम आणि वेळ हवा आहे. भारतात राहूनच मेहनत करुन आणि आपली कमाई वाढवून तो ही सर्व देणी फेडू इच्छितो. या कठीण प्रसंगानंतर राजपाल पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT