Rajpal Yadav  Dainik Gomantak
मनोरंजन

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

Rajpal Yadav Loan Case: कलाकार राजपाल यादव यांना ९ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी तिहार कारागृहात जावे लागल्यानंतर बॉलिवूडमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Sameer Panditrao

कलाकार राजपाल यादव यांना ९ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी तिहार कारागृहात जावे लागल्यानंतर बॉलिवूडमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, जामीन मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कलाकारांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

सलमान खान, अजय देवगण, सोनू सूद, वरुण धवन तसेच दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी राजपाल यांना सहकार्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. याशिवाय गुरु रंधावा, गुरमीत चौधरी, संगीत दिग्दर्शक राव इंदरजीत यादव आणि इतर काही व्यक्तींनीही आर्थिक मदतीची तयारी दर्शवली आहे.

राव इंदरजीत यादव यांनी तब्बल १.११ कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे, तर काही राजकीय व्यक्तींनीही आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे. राजपाल यादव यांचे कायदेशीर संकट २०१० साली घेतलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या कर्जापासून सुरू झाले.

‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी घेतलेले हे कर्ज चित्रपट अपयशी ठरल्यानंतर फेडता आले नाही. परतफेडीसाठी दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले आणि दंड व व्याजामुळे रक्कम वाढत गेली.

व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीय मानसिकदृष्ट्या खंबीर आहेत आणि सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधून मिळणारा हा पाठिंबा राजपाल यादव यांच्यासाठी दिलासादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT