Nawazuddin Siddiqui Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: 'रजनीकांत यांच्यासोबत 'पेट्टा' मध्ये काम करताना मी त्यांना फसवलं' अभिनेत्याचा मोठा खुलासा

Nawazuddin Siddiqui: यानंतरही कौतुक झाले तर तुम्हाला लपून बसावे वाटते.

गोमन्तक डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui: काही कलाकार असे आहेत ज्यांच्या अभिनयावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यांच्या अभिनयाचे चाहते असलेले लोक अशा कलाकारांना चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतात. नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्या कलाकारांपैकी एक आहे, जो आपल्या अभिनयामुळे ओळखला जातो. आता या अभिनेत्याने सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर पेट्टा या चित्रपटात काम केल्यानंतर मी त्यांना फसवल्यासारखे मला वाटले होते, असा खुलासा केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांच्याबरोबर 'पेट्टा' या तमिळ चित्रपटात काम केल्यानंतर आपल्याला अपराधी वाटले होते असे वक्तव्य केले आहे. ते म्हणतात- 'जेव्हा मी रजनी सरांसोबत 'पेट्टा' चित्रपटात काम केले, तेव्हा चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर मला खूप अपराधी वाटले कारण मला असे वाटले की मी पैसे घेत आहे.

मी काय करत आहे याची मला कल्पना नव्हती. मला वाटले की मी त्यांना मूर्ख बनवले आहे. कारण एक चित्रपट जेव्हा निर्माण होत असतो, त्यावेळी त्यांना अनेक गोष्टी असतात. अॅक्टिंग, डबिंग, आपण जे बोलतोय त्या वाक्यांचे अर्थ लागणे महत्वाचे असते. मात्र मी जास्त काही करु शकलो नाही, त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. मला सतत असे वाटत होते की मी त्यांना फसवले आहे, त्या कामाचे पैसे घेत आहे जे मी केलेच नाही' अशा आशयाच्या भावना अभिनेत्याने या मुलाखतीदरम्यान व्यक्त केल्या आहेत.

याशिवाय नवाजुद्दीन म्हणाला, 'यानंतरही कौतुक झाले तर तुम्हाला लपून बसावे वाटते आणि जेव्हा तुम्हाला त्यासाठी पैसे मिळतात तेव्हा तुम्ही स्वतःला विचारता की तुम्ही फसवणूक करत आहे का?'

नवाजुद्दीनने व्यंकटेश अभिनीत यांच्या 'सैंधव' या पहिल्या तेलुगू चित्रपटासाठी मोठे पाऊल उचलले. तो म्हणाला, 'म्हणूनच मी 'सैंधव'मध्ये सर्व काही केले. मी स्वतः डबिंग केले आणि मी शूट करत असलेल्या डायलॉग्सचा अर्थ समजला. त्यामुळे माझा अपराधीपणा थोडा कमी झाला. आता सैंधव हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाल करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT