Jailer Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Box Office Collection : थलैवाच्या जादूची बातच न्यारी ....जेलरने गाठला 300 कोटींचा टप्पा

अभिनेता रजनीकांतच्या नुकत्याच रिलीज झालेल्या जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत अजुनही थलैवाची जादू चालते हेच सिद्ध केले आहे.

Rahul sadolikar

थलैवा अर्थातच सुपरस्टार रजनीकांतच्या जेलर चित्रपटाने 'गदर 2' च्या एक दिवस आधी बंपर ओपनिंगसह प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या 'जेलर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, या चित्रपटाने 4 दिवसांत जी कमाई केली आहे, ती रजनीकांतच्या चित्रपटाच्या दृष्टीने निश्चितच कमी आहे. मात्र, या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

गदर 2 च्या आधीच चित्रपट रिलीज

एकीकडे बॉलीवूडचे चाहते 'गदर 2' ची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तर दुसरीकडे दक्षिणेतील बॉलिवूड चाहतेही रजनीकांतच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जेलर'ची वाट पाहत होते. रजनीकांतचा 'जेलर' सनी देओलच्या 'गदर 2' च्या एक दिवस आधी रिलीज झाला आणि त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी बंपर ओपनिंग झाला. 

या चित्रपटाने चौथ्या दिवशी जगभरात 300 कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रजनीकांतच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत जेलरचे कलेक्शन फारच कमी वाटत आहे.

जेलरचे कलेक्शन

रजनीकांत ज्याला त्यांचे चाहते हिरो नाही तर देवच मानतात. रजनीकांत यांचा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो आणि असेच वातावरण चित्रपटगृहांमध्येही पाहायला मिळते. 

sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी दमदार ओपनिंग असलेल्या 'जेलर' चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली असली तरी दुसऱ्या दिवशी जेलरचे कलेक्शन कमी झाले. रविवारी, रजनीकांतच्या चित्रपटाने चारही भाषांमध्ये (तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी) एकूण 38.00 कोटींचा गल्ला जमवला आहे.

तमिळमधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

'जेलर' चित्रपटाने चार दिवसांत 146.40 कोटींचा आकडा गाठला असून पहिल्या दिवशी 48.35 कोटी, दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.95 कोटी आणि चौथ्या दिवशी सुमारे 38.00 कोटींची कमाई केली आहे. जेलरने हिंदीमध्ये खूपच कमी कमाई केली आहे, जी पहिल्या दिवशी 35 लाख, दुसऱ्या दिवशी 15 लाख आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखांच्या जवळपास आहे. तमिळमध्ये हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.

चित्रपटाची जबरदस्त कमाई

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचे तर, या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात 222.10 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने तीन दिवसांत विदेशात 95.00 कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतात तीन दिवसांत 127.10 कोटी रुपयांची कमाई केली.

कार्यालयांना सुट्टी

रजनीकांतच्या इतर चित्रपटाचा विचार केला तर दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या 'जेलर'चे कलेक्शन निराशाजनक आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार आणि मोहनलाल यांसारखे अनेक सिनेस्टार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. याला रजनीकांतबद्दलची क्रेझ म्हणावी लागेल की या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त अनेक कार्यालयांनी सुट्टी जाहीर केली होती.

जेलरची कथा काय आहे?

'जेलर' हा चित्रपट पिता-पुत्राची कथा आहे, ज्यामध्ये रजनीकांत मुथुवेल पांडियन या एका निवृत्त जेलरची भूमिका साकारत आहेत. आपल्या कुटुंबासोबत साधे जीवन जगणारा तो एक प्रामाणिक अधिकारी आहे. त्याचा मुलगा अर्जुन (वसंत रवी) हा देखील एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे. 

एकदा अर्जुनचे वर्मा (विंकयन) सोबत भांडण झाले, जो पुरातन वास्तू आणि देवांच्या मूर्तींची तस्करी करतो. यानंतर त्याचा खून होतो आणि मग वडील नियोजन करून त्या खुन्यांना मारतात. पण नंतर कथेला नवीन वळण मिळते कारण त्यांना कळते की त्याच्या मुलाला अपहरणकर्त्याने जिवंत ठेवले आहे. अनेक लोक याला 'मदर इंडिया' चित्रपटाची नवीन आवृत्ती म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT