Rajesh Khanna Film Anand untold storie
Rajesh Khanna Film Anand untold storie Dainik Gomantak
मनोरंजन

'आनंद' चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना दिग्दर्शकाच्या सर्व अट मान्य होत्या

दैनिक गोमन्तक

1971 साली प्रदर्शित झालेला राजेश खन्ना यांचा 'आनंद' (Anand) चित्रपट सर्व सिनेरसिकांच्या स्मरणात आहे. पण, या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना राज कपूर यांना कास्ट करायचे होते, जे त्यावेळी खूप आजारी होते. अखेर हा चित्रपट राजेश खन्ना यांना मिळाला. या चित्रपटात राजेश खन्ना यांना कास्ट करण्याची कथाही खूप रंजक आहे.

जेव्हा हृषिकेश मुखर्जी राज कपूरला 'आनंद'मध्ये कास्ट करू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी किशोर कुमार, शशी कपूर आणि बांगला चित्रपट स्टार उत्तम कुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांशी बोलले, परंतु कोणाशीही चर्चा होऊ शकली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना यांना गुलजारच्या माध्यमातून 'आनंद' चित्रपटाची माहिती मिळाली होती.

गुलजार यांनी दिली होती माहिती...

जेव्हा गुलजार यांनी 'आनंद'ची स्क्रिप्ट राजेश खन्ना यांना सांगितली तेव्हा ते इतके प्रभावित झाले की त्यांनी कोणत्याही मानधनासह चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या संदर्भात राजेश खन्ना हृषिकेश मुखर्जीला भेटायला आले तेव्हा दिग्दर्शकाला खूप आश्चर्य वाटले. एक सुपरस्टार त्याला चित्रपटात काम करण्याची विनंती करत आहे हे पाहून ते थक्कच झाले होते.

राजेश खन्नांची सुपरहिट चित्रपट

राजेश खन्ना यांनी 'आराधना' आणि 'दो रास्ते' सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यानंतर ते प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 8 लाख रुपये मानधन घ्यायचे. जी त्यावेळीची खूप मोठी रक्कम होती. 'आनंद' चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. राजेश खन्ना यांनी चित्रपटात काम करण्याची इच्छा दाखवली तेव्हा हृषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या.

राजेश खन्ना यांनी हृषिकेश मुखर्जीच्या सर्व अटी मान्य केल्या

हृषीकेश मुखर्जी यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांना फक्त एक लाख रुपये फी म्हणून देऊ शकणार आणि त्यांना वेळेवर शूटिंगसाठी यावे लागेल. जेव्हा निर्मात्याने तिसरी अट घातली की काकांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी भरपूर वेळ द्यावा लागतील, तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांची डायरी हृषिकेश मुखर्जी यांच्यासमोर ठेवली आणि सांगितले की दादा तुम्हाला पाहिजे ती तारीख यामध्ये लिहा. यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. राजेश खन्ना यांनी हृषीकेश मुखर्जीच्या या सर्व अटी मान्य केल्या आणि मनापासून चित्रपटात काम केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT