Rajesh Khanna - Raj Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Rajesh Khanna - Raj Kapoor : जेव्हा या अभिनेत्रीसाठी राजेश खन्ना यांनी चक्क शोमॅन राज कपूरशी पंगा घेतला होता...

हा तो किस्सा आहे जेव्हा बॉलिवूडचा सुपरस्टार आणि बॉलिवूडचा शोमॅन यांच्यात एका अभिनेत्रीसाठी वाद झाला होता

Rahul sadolikar

बॉलिवूड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं. कधी कधी चित्रपटांची चर्चा तर कधीकधी कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याचीही चर्चा होत असते, यात कधीकधी कलाकारांच्या अफेअर्सची चर्चाही जोर धरू लागते.

ही चर्चा आताच नाही तर अगदी पूर्वीपासुन होत आली आहे. सध्या सोशल मिडीयावर राजेश खन्ना, बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि एका अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकी काय आहे ही चर्चा चला जाणुन घेऊया.

 बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया ही तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होतीच पण चाहत्यांना तिचा अभिनयही तितकाच प्रिय वाटत होता. डिंपल कपाडियावर अनेक बड्या कलाकारांनी जीव टाकला होता. , परंतु डिंपलने आपले हृदय त्याकाळचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना दिले. 

दोघांमध्ये वयाचे अंतर होते, पण असे असतानाही डिंपल आणि राजेशचे लग्न झाले. ही जोडी चाहत्यांची लाडकी होती. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात इतके मग्न झाले होते की, त्या काळातील सर्वात मोठे निर्माता-दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांचे वैर घेतले होते. राजेश आणि राज कपूर यांच्यातील वैराचे कारण काय होते ते जाणून घेऊया. 

डिंपल कपाडियाने ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तो 'बॉबी' राज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. बॉबी या चित्रपटात ऋषी कपूर डिंपलसोबत दिसले होते. डिंपलचे वडील चुन्नीभाई कपाडिया यांनी आपल्या मुलीच्या बॉलिवूडमध्ये लाँचिंगसाठी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. 

राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. राजेश खन्ना यांनी जेव्हा डिंपलला पहिल्यांदा पाहिलं, त्याचवेळी ते डिंपल कपाडियावर फिदा झाले होते. त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटात डिंपलला घ्यायचे होते. मात्र, 'बॉबी' प्रदर्शित होईपर्यंत डिंपल दुसरा कोणताही चित्रपट करू शकत नसल्याचे राज कपूर यांनी स्पष्ट केले होते. याच कारणावरून राजेश खन्ना आणि राज कपूर यांच्यात वाद झाला.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया एकमेकांना डेट करू लागले. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. पुढे राजेश आणि डिंपलचे लग्न झाले. यानंतर राजेश खन्ना 'बॉबी'च्या शूटिंगमध्ये अडचणी निर्माण करू लागले. 

डिंपलने ऋषी कपूरसोबत काम करावे अशी राजेश खन्ना यांची इच्छा नव्हती. जरी नंतर बॉबी रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र, तोपर्यंत राजेश खन्ना आणि राज कपूर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT