Khakee Sequal coming soon Dainik Gomantak
मनोरंजन

Khakee Sequal: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगन दिसणार खाकीच्या सिक्वलमध्ये? जाणून घ्या स्टोरी आणि कास्टींगबद्दल

Khakee Sequal: खाकी हा चित्रपट 20 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा सुरु आहे.

Rahul sadolikar

Khakee Siqual coming soon : बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या खाकी चित्रपटाची स्टोरी आठवते का? हा तोच चित्रपट ज्यात अजय देवगनने खलनायक साकारला होता. पोलिस डिपार्टमेंटच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचा संघर्ष दाखवणारी ही कथा पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.

राजकुमार संतोषींचे दिग्दर्शन

राजकुमार संतोषी दिग्दर्शित या कॉप अॅक्शन ड्रामा सिनेमात अमिताभ बच्चन, अजय देवगण, ऐश्वर्या राय बच्चन आणि तुषार कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. 

आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कोण असेल आणि या चित्रपटाची निर्मिती कधी सुरू होईल आणि तो कधी प्रदर्शित होईल, चला जाणून घेऊया.

Khakee Siqual coming soon

खात्रीलायक वृत्त

अभिनेता-चित्रपट निर्माता आर्यमन रामसे, दिवंगत निर्माते केशू रामसे (ज्याने मूळ चित्रपट बनवला) यांचा मुलगा, न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत या बातमीची पुष्टी केली. 20 वर्षांनंतर 'खाकी'चा सीक्वल बनणार असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

खाकीची स्टोरी कंटिन्यू होणार

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार आर्यमन म्हणाला, 'होय, आम्ही 'खाकी'च्या सिक्वेलची योजना करत आहोत. स्क्रिप्टिंग चालू आहे. आमच्या मनात एक मूळ कथानक आहे.

आम्ही पुढच्या वर्षी या चित्रपटासह फ्लोरवर जाण्याचा विचार करत आहोत, कारण मूळ चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण होणार आहेत. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. 

आर्यमन पुढे म्हणाले, 'ही एक नवीन स्क्रिप्ट आहे आणि आजच्या काळावर आधारित आहे. तसेच, मूळची एक कंटिन्युएशन स्टोरी असेल.

अशी असेल कास्टींग

सीक्वलच्या कास्टिंगबद्दल आर्यमनला विचारले असता, 'माझे कुटुंब अक्षय सरांच्या जवळचे आहे, परंतु त्याच्या पात्राचा पहिल्या भागात मृत्यू होतो, त्यामुळे आम्ही त्याला दाखवू शकत नाही.

अजय सर (अजय देवगण) आणि ऐश्वर्याचे पात्रही मरतात. जेव्हा माझ्याकडे संपूर्ण स्क्रिप्ट असेल, तेव्हा मी अमित जी (अमिताभ बच्चन) यांच्याशी बोलेन. 

तुषार कपूरचीही चित्रपटात त्याची भूमिका सुरू ठेवायला मला आवडेल. आम्ही त्याच्यासोबत नवीन कास्टिंग करू. मी राजकुमार संतोषीजींशी बोललो आहे आणि मला फक्त त्यांनीच सिक्वेल दिग्दर्शित करायचा आहे.

खरी कुजबुज: क्राईम ब्रँचमध्ये 'सरकारी जावई'

Goa Water Crisis: साळावली धरणाशेजारीच पाण्यासाठी वणवण! ग्रामस्थांची व्यथा समोर येताच मानवाधिकार आयोगाची अधिकाऱ्यांना नोटीस

India vs New Zealand ODI: न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार सलामीवीर दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर; 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

Kadamba Bus Strike: 12 नोव्हेंबरला कदंब बससेवा ठप्प होणार? 22 मागण्यांसाठी चालक-कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत!

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; 11 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी गंभीर जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT